वणी रोडवरील मोकाट जनावरे वाहनचालकांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:27 IST2020-07-09T21:25:43+5:302020-07-10T00:27:11+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील वणी - कृष्णगाव - ओझरखेड या रस्त्यावर असलेली मोकाट जनावरे सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वणी ते नाशिक हा नॅशनल हायवे दळणवळण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नाशिक ते गुजरात, गुजरात ते शिर्डी मार्गाने होणारी वाहतूक तसेच कंपनीसाठी लागणारा कच्चा मालदेखील या हायवेने येत असतो.

वणी रोडवरील मोकाट जनावरे वाहनचालकांसाठी डोकेदुखी
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील वणी - कृष्णगाव - ओझरखेड या रस्त्यावर असलेली मोकाट जनावरे सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वणी ते नाशिक हा नॅशनल हायवे दळणवळण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नाशिक ते गुजरात, गुजरात ते शिर्डी मार्गाने होणारी वाहतूक तसेच कंपनीसाठी लागणारा कच्चा मालदेखील या हायवेने येत असतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनासाठी विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात येत असते.
सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे भाग्य उजळले असले तरी मोकाट जनावरांची समस्या उद्भवली आहे. ही मोकाट जनावरे सरळ रस्त्याच्या मध्यभागी येऊन उभी राहतात. वाहनचालकांनी कितीही हॉर्न वाजविले तरीही ती जनावरे रस्त्यावरून बाजूला होत नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून वाहने आउट साइडने वळवावी लागतात. अशी कसरत करण्याच्या नादात अपघात होण्याचा धोका वाढत आहे. संबंधित विभागाने सदर मोकाट जनावरे पकडून त्यांची गोशाळेत रवानगी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.