शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याकडून मोहाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: April 5, 2017 00:09 IST

दिंडोरी : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना दिंडोरी तालुक्यात घडली़

दिंडोरी : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना दिंडोरी तालुक्यात घडली़ मुंबईतील भायखळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत व सुटीनिमित्त गावी आलेला पोलीस शिपाई गोरख मधुकर शेखरे (२५, रा़ टेलिफोन कॉलनी, दिंडोरी) याने मोहाडी येथील अल्पवयीन मुलीवर सोमवारी (दि़ ३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बलात्कार केला़ या प्रकरणी दिंडोरी पोलीसात शेखरेवर बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्यास ७ एपिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ (पान ३ वर)दिंडोरीतील टेलिफोन कॉलनीतील रहिवासी गोरख मधुकर शेखरे हा मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे़ सुटीवर आलेला शेखरे सोमवारी (दि़३) मोहाडीला आला़ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घराबाहेरील ओट्यावर भांडी धुण्याचे काम करीत होती़ शेखरे याने पाठीमागून येऊन तिच्यावर बलात्कार केला़ मुलीने आरडाओरड केल्याने तिचे भाऊ व कुटुंबीय तसेच नागरिकांना ही बाब समजली़ त्यांनी पीडितेची सुटका करून शेखरे यास पोलिसांच्या हवाली केले़ या प्रकरणी पीडित मुलीने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेखरे विरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को)अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दिंडोरी पोलिसांनी त्यास अटक केली आहे. मंगळवारी (दि़४) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास दिंडोरीचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित करीत आहेत़ (प्रतिनिधी)