देवीभक्तांनी दिला ‘बेटी बचाव’चा संदेश

By Admin | Updated: April 8, 2017 23:21 IST2017-04-08T23:20:59+5:302017-04-08T23:21:12+5:30

अनेक भक्तांनी ‘बेटी बचाव’चा सामाजिक संदेश देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

The message of 'Beti Rescue' by Divine devotees | देवीभक्तांनी दिला ‘बेटी बचाव’चा संदेश

देवीभक्तांनी दिला ‘बेटी बचाव’चा संदेश

 संगमेश्वर : चैत्र पौर्णिमेनिमित्त देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो देवीभक्त सप्तशृंगगडाकडे मार्गस्थ होत आहेत. यामुळे गडाकडील जाणारे सर्व रस्ते देवीभक्तांनी फुलून गेले आहेत. खान्देशातील काही मंडळांनी सामाजिक जागृतीचा वसा घेतला असल्याचे बघावयास मिळत आहे. अनेक भक्तांनी ‘बेटी बचाव’चा सामाजिक संदेश देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. यातीलच धुळे येथील विजय व्यायामशाळेच्या मंडळाने व जय माता दी ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या गाड्यांवर लावलेले ‘बेटिया सब के मुकद्दर मे कहा होती है, खुदा को पसंत आये वहा होती है’ अशा आशयाचे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
खान्देशातील देवीभक्तांनी ‘बेटी है तो कल है, बेटी बचाओ, देश बचाओ’चे फलक आपल्या वाहनांना लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.


 

Web Title: The message of 'Beti Rescue' by Divine devotees