शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

एकमतासाठी बैठकांचा फार्स : रविवारी पुन्हा बैठक

By admin | Updated: April 15, 2017 23:37 IST

महत्त्वाच्या विषय समित्यांमधून कॉँग्रेस ‘आउट’?

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर सदस्यांची वर्णी लावण्यासाठी त्या त्या पक्षांचे संख्याबळ गृहीत धरण्यावर सर्वच राजकीय पक्षांचे एकमत झाल्याचे वृत्त आहे. तथापि, महत्त्वाच्या स्थायी समितीसह बांधकाम व जलसंधारण समितीमधून कॉँग्रेसला स्थान मिळणे अवघड असल्याचे चित्र आहे.दरम्यान, शनिवारी (दि.१५) दिवसभर शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांसह सदस्यांनी हजेरी लावत बैठकांवर बैठकांचा फार्स केला. सायंकाळपर्यंत विषय समित्यांचे खातेवाटप वगळता विषय समिती सदस्यांच्या निवडीवर सर्वच पक्षांचे एकमत झाल्याचे समजते. स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड करण्यात येणार असून, त्यात संख्याबळानुसार शिवसेनेला तीन, तसेच भाजपा व राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन सदस्यांचा कोटा दिल्याचे समजते. उर्वरित एका सदस्याची निवड कॉँग्रेसमधून की अपक्षांमधून करावी, याबाबत एकमत झाले नसल्याचे समजते. जलसंधारण समितीच्या सहा सदस्यांची निवड करताना संख्याबळानुसार शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी लावण्यावर एकमत झाले असून, त्यातून ‘तीन महिला कोणत्या’ हा विषय प्रलंबित असल्याचे कळते. बांधकाम समितीवर आठ सदस्यांची निवड करावयाची असून, त्यात राष्ट्रवादीला झुकते माप मिळण्याची चिन्हे असून, सर्वाधिक तीन, तर त्या पाठोपाठ भाजपा व शिवसेनेला प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी बांधकाम समितीवर लावण्यात येणार आहे. या समितीवरही कॉँग्रेसऐवजी अपक्षाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थायी, बांधकाम व जलसंधारण अशा महत्त्वाच्या समितीतून कॉँग्रेसच्या एकाही सदस्याची वर्णी न लागल्यास महत्त्वाच्या समित्यांमधून कॉँग्रेस आउट होणार असल्याची चर्चा आहे. शनिवारी सायंकाळी पुन्हा जिल्हा परिषदेच्या आवारात भाजपा व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावत विषय समिती खातेवाटपाबाबत चर्चा केल्याचे समजते. (प्रतिनिधी)