शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत मराठा समाजाची बैठक

By admin | Updated: September 22, 2016 01:41 IST

मूक मोर्चा : महिला, युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

सिडको : नाशिक येथे शनिवारी (दि. २४)होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सिडकोसह अंबड, मोरवाडी, कामटवाडे भागातून जास्तीत जास्त महिला व युवकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.कोपर्डीतील पाशवी बलात्कार व हत्त्येच्या निषेधार्थ तसेच आरक्षण अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या मागणीसाठी सिडको कामटवाडे येथील मथुरा मंगल कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीप्रसंगी नाशिक येथे शनिवारी (दि. २४) होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सूचना देण्यात आल्या. तसेच समाजबांधवांनी एकजूट दाखवत त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे तसेच महिला व युवकांनी सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच येत्या शनिवारी कामटवाडे परिसरातील नागरिकांनी सामूहिकरीत्या एकत्रित येऊन मारुती मंदिर कामटवाडे गाव येथे उपस्थित राहून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले. प्रास्ताविक भाऊसाहेब मटाले, रवि मटाले यांनी तर मोर्चाचे नियोजन व सूचनांबाबत भिका मटाले यांनी मार्गदर्शन केले.बैठकीप्रसंगी दिनकर मटाले, शांताराम मटाले, नारायण मटाले, दीपक मटाले, अनिल मटाले, छगन बंदावणे, बाळासाहेब साळुंखे, बाजीराव मटाले, सुभाष गायकर, खंडू मालुंजकर, कारभारी मोरे, बाळासाहेब मटाले, विशाल मटाले, शरद खुटवड, मनोज मटाले, सचिन मटाले, दामोदर मटाले, तुकाराम मटाले, शंकरराव मटाले आदिंसह कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)