शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

वयोवृद्धाकडून नर्मदा परिक्रमा पूर्ण

By admin | Updated: April 8, 2017 23:18 IST

तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील वयोवृद्ध बाबांनी अवघड समजली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे.

बेलगाव कुऱ्हे : म्हातारपणाचे ओझे घेऊन अन् काठीचा आधार घेत अनेक वयोवृद्ध जीवन जगत आहे.आयुष्याच्या शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या अनेक वयोवृद्धांना कोणाच्या आधाराशिवाय चालताही येत नाही. अशा वयात इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील वयोवृद्ध बाबांनी अवघड समजली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. या बाबांचे नाव आहे कोंडाजी धोंगडे, वय ७२. खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा त्यांनी पायी पूर्ण करीत आदर्श निर्माण केला आहे.धोंगडे बाबा लहानपणापासूनच पांडुरंगाचे निस्सिम भक्त. रोज न चुकता ते सकाळ, संध्याकाळ गावातील मंदिरात विठुरायाच्या दर्शनाला जातात. वीस वर्षांपासून त्यांच्या घरी संध्याकाळचा हरिपाठ नित्यनेमाने अखंडित चालूच आहे. त्र्यंबकेश्वर व पंढरपूरची वारीदेखील ते न चुकता करीत आहेत. अतिशय शांत, मनमिळावू स्वभावाचे धोंगडे बाबा मनी कुठलीही अपेक्षा न ठेवता परमेश्वराची भक्ती करीत आहे. खरा वारकरी सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिसरात परिचित आहेत. त्र्यंबकेश्वर व पंढरपूरच्या दिंडीत त्यांचा सहभाग असतो. आयुष्यात एकदातरी अतिशय कठीण समजली जाणारी नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा त्यांच्या मनी होती. त्यांनी ती ७२व्या वर्षी पूर्ण केली. इच्छाशक्ती व भक्तीच्या जोरावर त्यांनी नर्मदा परिक्रमेचा ३२०० कि.मी.चा पायी प्रवास त्यांनी तीन महिन्यांत पूर्ण केला. साधारणत: ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. यांनी रोज चाळीस ते पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा तीन महिन्यात पूर्ण केली. (वार्ताहर)