वयोवृद्धाकडून नर्मदा परिक्रमा पूर्ण

By Admin | Updated: April 8, 2017 23:18 IST2017-04-08T23:18:32+5:302017-04-08T23:18:49+5:30

तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील वयोवृद्ध बाबांनी अवघड समजली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे.

Meet the Narmada Parikrama from the old age | वयोवृद्धाकडून नर्मदा परिक्रमा पूर्ण

वयोवृद्धाकडून नर्मदा परिक्रमा पूर्ण

बेलगाव कुऱ्हे : म्हातारपणाचे ओझे घेऊन अन् काठीचा आधार घेत अनेक वयोवृद्ध जीवन जगत आहे.
आयुष्याच्या शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या अनेक वयोवृद्धांना कोणाच्या आधाराशिवाय चालताही येत नाही. अशा वयात इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील वयोवृद्ध बाबांनी अवघड समजली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. या बाबांचे नाव आहे कोंडाजी धोंगडे, वय ७२. खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा त्यांनी पायी पूर्ण करीत आदर्श निर्माण केला आहे.
धोंगडे बाबा लहानपणापासूनच पांडुरंगाचे निस्सिम भक्त. रोज न चुकता ते सकाळ, संध्याकाळ गावातील मंदिरात विठुरायाच्या दर्शनाला जातात. वीस वर्षांपासून त्यांच्या घरी संध्याकाळचा हरिपाठ नित्यनेमाने अखंडित चालूच आहे. त्र्यंबकेश्वर व पंढरपूरची वारीदेखील ते न चुकता करीत आहेत. अतिशय शांत, मनमिळावू स्वभावाचे धोंगडे बाबा मनी कुठलीही अपेक्षा न ठेवता परमेश्वराची भक्ती करीत आहे. खरा वारकरी सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिसरात परिचित आहेत. त्र्यंबकेश्वर व पंढरपूरच्या दिंडीत त्यांचा सहभाग असतो. आयुष्यात एकदातरी अतिशय कठीण समजली जाणारी नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा त्यांच्या मनी होती. त्यांनी ती ७२व्या वर्षी पूर्ण केली. इच्छाशक्ती व भक्तीच्या जोरावर त्यांनी नर्मदा परिक्रमेचा ३२०० कि.मी.चा पायी प्रवास त्यांनी तीन महिन्यांत पूर्ण केला. साधारणत: ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. यांनी रोज चाळीस ते पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा तीन महिन्यात पूर्ण केली. (वार्ताहर)




 

Web Title: Meet the Narmada Parikrama from the old age