शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गट आरक्षित झाल्याने मातब्बरांचा हिरमोड

By admin | Updated: January 20, 2017 00:28 IST

उमराणे गट : राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला

भगवान देवरे उमराणेयंदा उमराणे गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही स्थानिक मातब्बरांचा हिरमोड झाला असून, याच गटातील उमराणे गण मात्र सर्वसाधारण झाल्याने येथे तरुण इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. त्याचबरोबर या गणातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी स्थानिक पारंपरिक राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दहिवड गण हा इतर मागास वर्ग स्त्रीसाठी आरक्षित असल्याने या गणात मात्र चुरस कमी असणार आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांचा इतिहास पाहता उमराणे गटात कुठल्याही राजकीय पक्षांचे विशेष प्राबल्य नसून या गटात पूर्वीपासून पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला परिचित असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांच्या घराण्यांभोवतीच स्थानिक ग्रामपंचायतीपासूनच्या सर्वच निवडणुका अत्यंत चुरशीच्या लढविल्या गेल्या. आजतागायत हे दोन्ही गट राजकारणात सक्रिय असून, ग्यानदेवदादा देवरे यांच्या गटाचे नेतृत्व माजी सदस्य कै. निवृत्ती देवरे यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुतणे व बाजार समितीचे सभापती विलास देवरे सांभाळत आहेत. विश्वासराव देवरे यांच्या गटाचे नेतृत्व त्यांचे पुत्र व सुरगाणा गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे सांभाळत आहेत. त्यामुळे या उमराणे गटात कुठल्या राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळावी यापेक्षा कोणत्या गटाकडून मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांना कसरत करावी लागते. उमराणे गणातून माजी सदस्य मीनाक्षी देवरे यांनीही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत अपक्ष उमेदवार व माजी पंचायत समिती उपसभापती रतन देवरे यांची पत्नी सुवर्णा देवरे तसेच शिवसेनेकडून उमेदवारी करत असलेल्या शिवसेनेचे देवळा तालुकाध्यक्ष देवानंद वाघ यांच्या पत्नी वंदना वाघ यांचा पराभव केला होता. तसेच दहिवड गणातून भाजपाचे केदा शिरसाठ यांनी कॉँगेसकडून उमेदवारी करीत असलेले गंगाधर शिरसाठ, राष्ट्रवादीचे आबा खैरनार, अपक्ष केवळ वाघ यांचा पराभव केला होता. तथापि उमराणे गटात फारशी चुरस नसली तरी उमराणे गणातील निवडणुकीमुळे गटाच्या निवडणुकीला खरी रंगत येणार आहे.