सिन्नर : येथील आगारातून श्री क्षेत्र मथुरा, द्वारका आदि तीर्थक्षेत्रांसाठी मंगळवारपासून (दि.२९) बससेवेस प्रारंभ होणार असून, पहिल्या बसच्या प्रवासाला दुपारी एकला प्रारंभ होणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक दिलीप जाधव यांनी दिली. तालुक्यातील बारागावपिंप्री येथे या पहिल्या बसेसचे स्वागत करण्यात येणार असून, या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, मंगळवारी दुपारी १२ वाजता भागवताचार्य वृंदावन ह.भ.प. अर्चनाताई गिरी यांचे प्रवचन होणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}