शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: July 31, 2016 22:20 IST

नद्यांना पूर : गोदावरी, दारणा दुथडी भरून वाहू लागल्याने सतर्कतेचा इशारा

नाशिक : इगतपुरी, दिंडोरी, पेठ सुरगाणा या तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला आहे, वाडीवऱ्हे परिसरात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात दमदार पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.इगतपुरी, घोटी शहरासह सर्व भागात पावसाने हजेरी लावली. संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद, बेलगाव तऱ्हाळे, बारशिंगवे, सोनोशी, अडसरे, भरवीर, कवडधरा, धामणी, वैतरणा, भावली धरण परिसर, काळूस्ते आदि भागाला कालपासून पावसाने झोडपून काढले.दरम्यान, या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून तालुक्यातील दारणा, भाम, वाकी, खापरी, कडवा आदि नद्यांना पूर आला आहे.दमदार पावसामुळे तालुक्यातील प्रमुख धरण असलेल्या दारणा धरणात ७७ टक्के साठा झाला असून कडवा धरण तब्बल ८३ टक्के भरले आहे. दारणा धरणातून गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने या धरणसमूहातून सुमारे सात टीएमसी पाणी जायकवाडीला देण्यात आले असल्याचे समजते, तर मुकणे धरण परिसरात अल्प पाऊस होत असल्याने या धरणात अवघे २१ टक्के पाणी साचले आहे. (वार्ताहर)