मनमाड : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. यंदाच्या वर्षी दिवाळी सणावर कोरोनाचे सावट असल्याने त्याचे परिणाम बाजारपेठेवर जाणवत आहेत.वाढलेली महागाई, कोरोनाकाळात वाढलेली बेरोजगारी, ऑनलाइन शॉपिंगला वाढत चाललेली ग्राहकांची पसंती, अनेक नागरिक हे गर्दीमध्ये जाणे टाळत असल्याने ग्राहकांचा बाजारपेठेत खरेदीसाठी अल्पप्रतिसाद मिळत आहे.बाजारामध्ये विविध प्रकारचे दुकाने लावण्यात आलेली आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या आकाशकंदीलचे विविध प्रकार बघायला मिळत आहे, हाताने बनवलेल्या आकाशकंदिलांना ग्राहकांकडून पसंदी मिळत आहे. घरावर लावण्यासाठी लायटिंग, आर्टिफिशियल फुलांचे तोरण यांचे विविध प्रकार उपलब्ध आहे.दिवाळीत लावण्यात येणाऱ्या पारंपरिक पणत्या आणि दिव्यांचेदेखील विविध प्रकार यंदा बाजारात उपलब्ध आहेत. पूजेसाठी लागणारे झाडू, शिराई, बत्तासे, करदोडे, लक्ष्मी मातेची मूर्ती यांचेदेखील दुकाने लावण्यात आलेली आहेत.दिवाळीमध्ये नवीन कपडे खरेदीसाठी ग्राहक मोठी गर्दी करत असतात. यासाठी अनेक कापड दुकानांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कपड्यांच्या विविध प्रकारांबरोबर विविध प्रकारच्या सूट देऊ ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे.
दिवाळी सणासाठी बाजारपेठ सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 00:47 IST
मनमाड : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. यंदाच्या वर्षी दिवाळी सणावर कोरोनाचे सावट असल्याने त्याचे परिणाम बाजारपेठेवर जाणवत आहेत.
दिवाळी सणासाठी बाजारपेठ सजली
ठळक मुद्देमनमाड : ग्राहकांचा खरेदीसाठी अल्पप्रतिसाद