शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती सचिवांना धरले धारेवर

By admin | Updated: April 30, 2017 01:57 IST

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांची दिशाभूल केली जाते. याशिवाय कर्मचाऱ्यांवर कोणचाही अंकुश नाही, त्यातच बाजार समितीचे उत्पन्न घटले आहे.

 पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांची दिशाभूल केली जाते. याशिवाय कर्मचाऱ्यांवर कोणचाही अंकुश नाही, त्यातच बाजार समितीचे उत्पन्न घटले आहे. उपसमितीत पाहिजे तसे ठराव मांडून ते मंजुरीसाठी सभागृहात पाठविले जात असल्याच्या कारणावरून संतप्त संचालकांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना चांगलेच धारेवर धरले. कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा उपसभापती श्याम गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत सचिव अरुण काळे यांचे कामकाज समाधानकारक नसून संचालकांची दिशाभूल करणारे असल्याने व त्यातच त्यांच्याकडून बाजार समितीच्या कामकाजाविषयी व्यवस्थितपणे माहिती दिली जात नसल्याने ते प्रशासकीय कामकाजात असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समितीची आर्थिक परिस्थिती खराब झाली असल्याचे पत्र संचालकांनी उपसभापतींना देत सदर विषय पुढील बैठकीत घेण्याबाबत चर्चा केली. बाजार समितीतील गाळे स्थलांतरित केलेले आहे. बाजार समितीत यापूर्वी काही गाळेधारकांनी गाळ्यांसमोर पत्र्याचे शेड उभारले ते पैसे घेऊन उभारल्याचा आरोप संचालकांनी केला, तर कांदा, बटाटा व ज्या ठिकाणी हमाल मापारी काम करतात त्याठिकाणी शेड गरजेचे असल्याने ते ठेवावेत, अशी मागणी चंद्रकांत निकम यांनी केली. साखर सेवा शुल्क विषयी ठराव दिलेला नसताना त्या विषयावर सूचक म्हणून संचालक संदीप पाटील, तर अनुमोदक म्हणून जगदीश अपसुंदे यांची नावे टाकल्याचा धक्कादायक प्रकार अपसुंदे यांनी बैठकीत उघडकीस आणला. बाजार समितीचे अरविंद जैन, दिगंबर चिखले व विजय निकम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने कारवाई केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी समिती नेमावी तसेच निकाल लागेपर्यंत त्यांचे निलंबन कायम ठेवावे, असा विषय मांडण्यात आला. उपसमित्या सोयीसाठी असल्याने त्या बरखास्त कराव्यात तसेच उपसमितीच्या कोणत्याही विषयावर आगामी कालावधित सह्या करणार नसल्याचे काही संचालकांनी सांगितले. बाजार समितीत नवीन गाळ्यांना परवानगी देऊ नये आदिंसह विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. बाजार समितीत झालेल्या या बैठकीला शंकर धनवटे, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, आर. टी. भोये, भाऊसाहेब खांडबहाले, युवराज कोठुळे, हंसराज वडघुले, सुनील खंदारे, शिवाजी चुंबळे, रूचि कुंभारकर, प्रवीण नागरे, संदीप पाटील, विश्वास नागरे, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार, प्रभाकर मळाणे, ताराबाई नार्वेकर, संपत सकाळे, विमल जुंद्रे आदि संचालक उपस्थित होते. (वार्ताहर)