शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मराठा क्रांती मोर्चा भुजबळ यांची घेणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:07 AM

नाशिक- आरक्षण प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आंदालन करण्यात आल्यानंतर त्यांची भेट न झाल्याने व्यक्त झालेला संताप ही केवळ उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती. हा विषय मराठा क्रांती मोर्चाकडून संपला आहे. येत्या एक ते दोन दिवसात भुजबळ यांच्या समवेत समन्वयांची चर्चा होणार असल्याने आता कोणताही दुरावा नसल्याचे स्पष्टीकरण मोर्चाच्या पदाधिका-यांनी दिले आहे.

ठळक मुद्देआरक्षणप्रश्नी बैठक: दुरावा नसल्याचा दिला निर्वाळा

नाशिक- आरक्षण प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आंदालन करण्यात आल्यानंतर त्यांची भेट न झाल्याने व्यक्त झालेला संताप ही केवळ उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती. हा विषय मराठा क्रांती मोर्चाकडून संपला आहे. येत्या एक ते दोन दिवसात भुजबळ यांच्या समवेत समन्वयांची चर्चा होणार असल्याने आता कोणताही दुरावा नसल्याचे स्पष्टीकरण मोर्चाच्या पदाधिका-यांनी दिले आहे.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतिरीम स्थगिती दिल्याने समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधी मंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवून यासंदर्भात वटहुकूम काढावा आणि शैक्षणिक तसेच नोकर भरतीपासून वंचीत राहणा-या समाजातील युवकांना दिलासा द्यावा अशी समाजाची मागणी आहे. त्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि.१८) भुजबळ फार्म येथे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच भुजबळ यांची भेट न झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. आंदोलनाच्या वेळी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळेभुजबळ हे त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. दरम्यान, या घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून भुजबळ आणि मराठा क्रांती मोर्चा असे चित्र निर्माण होत असून ते काही मंडळी जाणिवपूर्वक निर्माण करीत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. शनिवारी (दि.१९) समाजाचे नेते सुनील बागुल यांच्या निवासस्थानी मराठा समाजाच्या सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडली. यावेळी भुजबळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून त्यांची पूर्वनियोजीत वेळ घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्यासह केंद्र शासनाकडे बाजू मांडावी यासाठी भूजबळ यांच्याकडे आग्रह धरण्यात येणार आहे.या बैठकीस समाजाचे नेते करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, चेतन शेलार, राजेश पवार, आशिष हिरे,प्रफुल वाघ, नीलेश शेलार, शरद तुंगार, योगेश गांगुर्डे, तुषार गवळी, किशोर तिडके, शिवा गुंजाळ, नितीन बाळा निगळ, नीलेश मोरे आदी उपस्थित होते.राष्ट्रवादीवादीतील नेते भुजबळ यांच्या पाठीशी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील मराठा समाजाच्या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्यापाठीशी आहेत. मराठा आरक्षणासाठी भुजबळ यांचा पाठींबा होता. तसेच यापुढे देखील कायम राहणार आहे. आरक्षणाची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात आहे. शासनाव्दारे ही लढाई न्यायालयातून जिंकाण्याचा प्रयत्न समाजाला जिंकायची आहे. भुजबळ यांना लक्ष्य करून आणि वितुष्ट वाढविण्यामुळे समाज मागे पडत आहे. हे समाज बांधवांनी लक्षात घ्यावे असे या नेत्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. माजी खासदार देवीदास पिंगळे, ज्येष्ठ नेते नाना महाले, जिल्हाध्यक्ष अ­ॅड, रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, माजी आमदार जयंत जाधव यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी हे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणChagan Bhujbalछगन भुजबळ