शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

अनेक ठिकाणी बंडखोरी शक्य

By admin | Updated: October 8, 2016 01:10 IST

पूर्व प्रभाग : निकुळे अडचणीत; सर्वसाधारण जागांवर वाढणार चुरस

संजय शहाणे इंदिरानगर
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभागरचनेत इंदिरानगर ते पाथर्डी फाटा पर्यंत अनेक प्रभागांची मोडतोड करण्यात आली असून त्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. मनसेचे विद्यमान नगरसेवक यशवंत निकुळे यांना निवडणूक अडचणीची ठरली असून दोन नव्या प्रभागांत अनेक विद्यमान नगरसेवक आमनेसामने येण्याची शक्यता आहे, तर काही प्रभागांत बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
महापालिकेचा सध्याचा प्रभाग क्रमांक ४० व ३८ मिळून नवीन प्रभाग क्रमांक २३ प्रस्तावित झाला आहे. यात लाकेसंख्या ५१,१९१ इतकी लोकसंख्या आहे. यात विद्यमान मनसे नगरसेवक यशवंत निकुळे व डॉ. दीपाली कुलकर्णी यांचा प्रभाग असलेल्या भारतनगर, श्रीरामनगर, विनयनगर, कमोदनगर आणि इंदिरानगरचा समावेश आहे.
तसेच सतीश कुलकर्णी व नीलिमा आमले यांचा हॅपी होम कॉलनी, अशोका मार्ग, खोडेनगर, गणेश बाबानगर आणि डीजीपीनगरचा भाग जोडला गेला आहे. त्यात चार जागांपैकी अनुसूचित जमाती आणि ओबीसी अशा दोन जागा महिलांसाठी राखीव असून, दोन सर्वसाधारण जागा खुल्या आहेत. यापूर्वी अनुसूचित जमाती या राखीव प्रभागातून निवडून आलेले यशवंत निकुळे यांना आता खुल्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.
सध्याचे ५३, ५४ व ३० हे तीन प्रभाग मिळून नवीन प्रभाग क्रमांक ३० झाला आहे. त्याची लोकसंख्या ४७,७६३ आहे. यात विद्यमान नगरसेवक सतीश सोनवणे आणि अर्चना जाधव यांच्या प्रभागातील राजीवनगर, वैभव कॉलनी, किशोरनगर, पेठेनगर, वैभव कॉलनी, जाखडीनगर असा भाग असून त्याला अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांच्या प्रभागातील चिंतामणी कॉलनी, श्रद्धा विहार कॉलनी, शिवकॉलनी, पांडवनगर परिसर आला आहे.
वडाळा गावही त्याला जोडण्यात आले असून अशा स्थितीत ओबीसी व सर्वसाधारण अशा दोन महिला तर अनुसूचित जाती व सर्वसाधारण अशा दोन खुल्या जागा आहेत. सतीश सोनवणे आणि संजय चव्हाण या दोघांनाही हा प्रभाग सुरक्षित आहे. १
मात्र, प्रभागात खुल्या प्रवर्गाची एकच जागा असून त्याठिकाणी संजय चव्हाण आणि सतीश सोनवणे दावेदार आहेत. सोनवणे सध्या भाजपात असल्याने त्यांची पक्षाकडे दावेदारी असली तरी संजय चव्हाण हेदेखील भाजपाच्या मार्गावर असून तसे झाल्यास उमेदवारीसाठी सोनवणे आणि चव्हाण यांच्यात स्पर्धा होणार आहे.२
याच भागात सध्याचा प्रभाग क्रमांक ५२ व ५२ मिळून प्रभाग क्रमांक ३१ हा सर्वात शेवटचा प्रभाग असून त्यात पाथर्डी गाव म्हणजेच सुदाम कोंबडे आणि वंदना बिरारी यांचा प्रभाग हा सतीश सोनवणे यांच्या प्रभागाला जोडला गेला आहे. परंतु या सोनवणे आणि थोरात यांनी नवा प्रभाग क्रमांक ३० मध्ये निवडणूक लढविल्यास आजमितीला सुदाम कोंबडे आणि वंदना बिरारी यांच्यासाठी हा प्रभाग सुरक्षित आहे.
तीन पैकी दोन महिला
शहरातील दोनच प्रभाग तीन सदस्यीय असून त्यात प्रभाग क्रमांक १५चा समावेश आहे. किनारा हॉटेल ते द्वारका, काठे गल्ली, शंकरनगर, गीताईनगर, भाभानगर असा भाग असून त्यात सद्यस्थितीत सचिन मराठे, अर्चना थोरात, वंदना शेवाळे व गुलजार कोकणी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रभागाचा सारडा सर्कलकडील भाग तुटला असल्याने हा प्रभाग छोटा आहे. या प्रभागात एक सर्वसाधारण व एक ओबीसी महिला असल्याने विद्यमान महिला नगरसेवकांना अडचण नाही; मात्र सर्वसाधारण असून या एकाच जागेवर मोठ्या प्रमाणात चुरस असणार आहे. सचिन मराठे यांना मोठा कस लागणार आहे.