शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

मानूर ग्रामस्थांना मिळाले पाणी

By admin | Updated: March 1, 2016 23:34 IST

दिलासा : चणकापूर उजव्या कालव्यातून चार दलघफू पाणी

 कळवण : चणकापूर उजव्या कालव्यातून मानूरसाठी बिगर सिंचनासाठी चार दलघफू पाणी देणे शक्य असल्याचा अहवाल गिरणा नदी खोरे प्रकल्प विभाग, नाशिकचे जिल्हाधिकारी कुशावह यांच्याकडे सादर केलेला असताना पाणी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीला प्रशासकीय यंत्रणेने चाप बसवल्याने मंगळवारी चणकापूर उजव्या कालव्यातून चार दलघफू पाणी मानूरकरांना मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.चणकापूर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशावह यांनी दिल्यानंतर पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता पाटील यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या गावांना चणकापूर उजव्या कालव्यातून पाणी न पोहोचल्याने आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नियोजनाप्रमाणे पाणी वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या.दरवर्षी जिल्हाधिकारी यांच्याकडून मानूर गावासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण होते. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभार व हलगर्जीपणामुळे तीन वर्षांपासून पाणी मिळत नसल्याने गेल्या २५ फेब्रुवारीला मानूरकरांवर आंदोलन करण्याची वेळ आली होती.चार दलघफू पाणी देण्याचा लेखी आदेश असूनही मानूर गावातील बंधारा पाण्याने न भरल्यामुळे मानूर येथील नागरिकांनी पंचायत समितीचे उपसभापती अ‍ॅड. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल पुरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. पोलीस निरीक्षक मधुकर गावित, पाटबंधारे विभाग सहायक अभियंता ए. बी. करनाळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत मानूर येथील नागरिकांनी आमचे चार दलघफू पाणी का देत नाहीत व आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळावे म्हणून मागणी केली होती . शिवाय पाटबंधारे विभाग आपली फसवणूक करत असल्याचा आरोप करून मानूरकरांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ््यांच्या मनमानीला कारभाराची चौकशीची मागणी केली होती.यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्याचा प्रकार समोर आला होता. तहसीलदार अनिल पुरे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना भेंडी येथे पाणी दिले गेले मग मानूर येथे पाणी का दिले जात नाही असा जाब विचारु न यंत्रणेला धारेवर धरले होते यावेळी सहाय्यक अभियंता करनाळे यांनी तो विभाग आपल्या अंतर्गत येत नसल्याचे सांगून मानूरसाठी ४ दशलक्षघनफूट पाणी आरिक्षत करण्यात आल्याचे बैठकीत सांगितले होते.मानूरसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक वेळी पाणी आरक्षित होते. मानूर ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरलेली असूनही मानूर गावाला पाणी मिळालेले नाही त्यामुळे पाटबंधारे विभागाने आपली फसवणूक केल्याचे ग्रामस्थांनी बैठकीत सांगितले होते, त्यामुळे पाटबंधारे विभागावरील विश्वास उडाल्याचे सांगून पाणी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती, मानूर येथील नागरिकांनी शासनाचा निषेध नोंदवत वेळ आली तर हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे सांगून बैठकीतून काढता पाय घेतला होता व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केली होती . (वार्ताहर)