शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

माजी ठेकेदाराविरुद्ध मनपा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:05 IST

घंटागाडीचा पंचवटी विभागातील माजी ठेकेदार समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीविरुद्ध कर्मचाºयांचे वेतन अदा न केल्याप्रकरणी महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर महापालिका वसुलीसाठी आक्रमक झाली असून, सदर कंपनीने अंबरनाथ पालिकेतही ठेका घेतलेला असल्याने मनपाने अंबरनाथ पालिकेला पत्र पाठवून ठेकेदाराची बिले रोखण्याचे पत्र पाठविले असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली.

नाशिक : घंटागाडीचा पंचवटी विभागातील माजी ठेकेदार समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीविरुद्ध कर्मचाºयांचे वेतन अदा न केल्याप्रकरणी महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर महापालिका वसुलीसाठी आक्रमक झाली असून, सदर कंपनीने अंबरनाथ पालिकेतही ठेका घेतलेला असल्याने मनपाने अंबरनाथ पालिकेला पत्र पाठवून ठेकेदाराची बिले रोखण्याचे पत्र पाठविले असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला संपूर्ण बिले अदा करणारे माजी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनाही आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.महापालिकेने मागील पंचवार्षिक काळात विभाग स्तरावर घंटागाडीचा ठेका दिला होता. त्यात पंचवटी विभागाचा ठेका ठाणे येथील समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता. सदर ठेकेदाराने नंतर उपठेकेदार नेमून दिला होता. संबंधित ठेकेदाराकडून घंटागाडी कर्मचाºयांना वेतन नियमित अदा केले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार आरोग्य विभागाकडे प्राप्त होत असत. शिवाय, अनियमित घंटागाड्यांच्याही तक्रारी लोकप्रतिनिधींकडून वारंवार केल्या जात असत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारला होता. दरम्यान, संबंधित ठेकेदाराची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी संपूर्ण बिले अदा केली.