मालेगावमधील उमेदवार न्यायालयाच्या वाटेवर

By Admin | Updated: September 30, 2014 22:57 IST2014-09-30T22:57:13+5:302014-09-30T22:57:28+5:30

मालेगावमधील उमेदवार न्यायालयाच्या वाटेवर

Malegaoner candidate passes by court | मालेगावमधील उमेदवार न्यायालयाच्या वाटेवर

मालेगावमधील उमेदवार न्यायालयाच्या वाटेवर

मालेगाव : येथील मालेगाव मध्य विधानसभा मतदारासंघातील भाजपा उमेदवाराचा अर्ज छाननीत एबी फॉर्म नसल्याच्या कारणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला असून, उमेदवाराने अर्जासोबत फॉर्मची छायांकित प्रत सादर केली असल्याचा दावा करत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली. यात भाजपा उमेदवार रफिक अहमद हाजी अहमद यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याचे कारण दिले आहे, तर उमेदवाराने अर्ज सादर करतेवेळी एबी फॉर्मची साक्षांकित प्रत जोडलेली असल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे. मात्र प्रशासन असे काहीही नसल्याचे सांगत आहे. या विरोधात रफिक अहमद यांनी दावा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे. उमेदवाराने उमेदवारी अर्ज, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज घेतेवेळी जोडलेल्या कागदपत्रांच्या दुय्यमप्रती, छायाचित्र व व्हिडिओ चित्रीकरण आदिंची मागणी केली आहे.

Web Title: Malegaoner candidate passes by court