खंडित विकासाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा छगन भुजबळ : विकासकामांबाबत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 05:39 PM2019-12-10T17:39:27+5:302019-12-10T17:40:04+5:30

येवला : मागील काळात जिल्हाभरातील विकासाची गती खंडित झाल्याने पुन्हा त्याच गतीने येवला मतदारसंघासह जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी शासनाला प्रशासनाची साथ असणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात अधिक मेहनत घेऊन सकारात्मक काम करूया असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना केले.

 Make a positive effort to spur fragmented development Chhagan Bhujbal: Review meeting on development works | खंडित विकासाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा छगन भुजबळ : विकासकामांबाबत आढावा बैठक

येवला-मतदारसंघ व जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठकीत बोलताना छगन भुजबळ.

Next
ठळक मुद्देयेवला संपर्ककार्यालय येथे येवला मतदारसंघ व जिल्ह्यातील विकासकामांबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सर्व खातेप्रमुख अधिकाऱ्यांंशी चर्चा करून कामकाजाचा आढावा घेतला.


यावेळी प्रांतअधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार रोहिदास वारु ळे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, महावितरणचे कार्यकारी अभियंता आर.डी. डोंगरे, येवल्याचे उपविभागीय अभियंता एस.एम. देवरे, उपविभागीय अभियंता उमेश पाटील, निफाडचे उपविभागीय अभियंता महेश पाटील, मांजरपाडा प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी विश्वास दराडे, बीडीओ उमेश देशमुख, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मकरंद सोनवणे, संजय सोमसे, संतोष खैरनार, विजय खोकले यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
छगन भुजबळ यांनी मंगळवारी बैठकीत रस्ते, पाणी, वीज, शेती यांसह येवला शहर व जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पंचनामेची सद्यस्थिती जाणून घेतली त्याचबरोबर एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीवाचून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी तंबी अधिकाºयांना दिली. जिल्ह्यातील खराब रस्त्यांची माहिती संकलित करून तातडीने दुरु स्ती करण्यासाठी कार्यवाही करावी. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याची, उर्वरित भरावांची, खोलीकरणाची व लिकेजेसची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून मार्गी लावावे. येवला प्रशासकीय कार्यालयात येणाºया शेतकरी बांधवांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्या. येवला शहर स्वच्छतेबाबत कारवाई करून संपूर्ण येवला शहर हे स्वच्छ राहायला हवे तसेच येवला सुशोभीकरणाची कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना दिले. तसेच अधिकाºयांंना आवश्यक ट्रान्सफॉर्मर तातडीने उपलब्ध करून द्यावे तसेच सिंगल फेज यंत्रणेच्या अडचणी तत्काळ दूर करण्यात याव्या. शेतकºयांना नुकसानभरपाईचे वाटप करून याबाबत शेतकºयांच्या असणाºया अडचणी दूर करा. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे सामोपचाराने पूर्ण करा तसेच कोणी खोडसाळपणे कामात अडथळे निर्माण करीत असेल तर त्यांच्यावर प्रसंगी कायदेशीर कारवाई करा. त्याचबरोबर रखडलेल्या कामांना गती देण्यात येऊन प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिले.

Web Title:  Make a positive effort to spur fragmented development Chhagan Bhujbal: Review meeting on development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.