आज साजरी होणार मकरसंक्रांत

By Admin | Updated: January 14, 2017 01:11 IST2017-01-14T01:11:18+5:302017-01-14T01:11:34+5:30

आज साजरी होणार मकरसंक्रांत

Makar Sankranti will be celebrated today | आज साजरी होणार मकरसंक्रांत

आज साजरी होणार मकरसंक्रांत

नाशिक : ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत नववर्षातील पहिला सण अर्थात मकरसंक्रांत सण साजरा करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असून, आबालवृद्धांनी त्यासाठी जंगी तयारी केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. याशिवाय यंदा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनीही मतदारराजाला संक्रांतीचा तिळगूळ देत मत देण्यासाठी साकडे घालण्यावर भर दिला आहे. आठवडाभर आधीपासूनच घरोघरी तसेच कार्यालयांमध्ये भेटीगाठी घेऊन तिळगूळ, शुभेच्छापत्र दिले आहेच, पण प्रत्यक्ष संक्रांतीला म्हणजे शनिवारीही मतदारराजाला सर्वत्र तिळगूळ देत मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यासाठी प्रचार कार्यालयाबरोबरच जागोजागी स्वतंत्र स्टॉल उभारण्याचे काम सुरू आहे.गृहिणी सकाळपासून विविध प्रकारच्या कामांमध्ये मग्न असणार आहे. संक्रांतीनिमित्त सूर्यदेवतेचे पूजन, सुगडी पुजणे, इतर सुवासिनींना दान देणे, स्वयंपाकात खिचडी, भोगीची भाजी, भाकरी, गूळपोळी असा खास बेत करीत दुपारी कुटुंबासह पतंग उडविण्याचा आस्वाद घेणार असून, त्यासाठी आदल्या दिवशीच तिळगूळ, लाडू-वड्या तयार करून ठेवणे, गूळपोळीची पूर्वतयारी, पूजेचे साहित्य आणून ठेवणे अशी तयारी करून ठेवली आहे. तर सकाळपासूनच पतंगोत्सवाला शहरात सुरुवात होणार आहे. पतंगोत्सवाचा पूर्ण आनंद घेता यावा व आपल्या कटलेल्या मांजामुळे इतरांच्या जिवावर बेतेल असे प्रकार होऊ नयेत म्हणून काही पतंगप्रेमींनी मोकळ्या मैदानांवर, शहरापासून दूर अंतरावरील मोकळ्या माळरानात जाण्याचा बेत आखलेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Makar Sankranti will be celebrated today