शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महाभारताचे झाले दैवीकरण

By admin | Updated: July 17, 2017 00:15 IST

नाशिक : रामायण-महाभारत पुराण किंवा महापुराण नसून उत्तम दर्जाचे ऐतिहासिक असे महाकाव्य आहे. हिंदू समाजापुढे कीर्तनकार व प्रवचनकारांनी या महाकाव्यामधील इतिहासाला कमी महत्त्व देत दैवीकरण केले

विवेक घळसासी : हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोपलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : रामायण-महाभारत पुराण किंवा महापुराण नसून उत्तम दर्जाचे ऐतिहासिक असे महाकाव्य आहे. मात्र दुर्दैवाने हिंदू समाजापुढे कीर्तनकार व प्रवचनकारांनी या महाकाव्यामधील इतिहासाला कमी महत्त्व देत दैवीकरण केले, अशी खंत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केली. ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प घळसासी यांनी रविवारी (दि.१६) गुंफले. रावसाहेब थोरात सभागृहात सुरू असलेल्या तीनदिवसीय व्याख्यानमालेचा समारोप झाला. यावेळी घळसासी यांनी ‘महाभारत : इतिहास की महाकाव्य’ या विषयावर बोलताना सांगितले की, रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्यांवर या देशात मालिका दाखविल्या गेल्या. या मालिका केवळ हिंदू वसाहतींमध्ये अथवा भारतातच श्रद्धेने बघितल्या गेल्या, असे मुळीच नाही तर बिगर हिंदू वसाहतींसह बांगलादेश, पाकिस्तानमध्येही या मालिकांनी गारुड केले; मात्र मालिकांमधून या महाकाव्यांचा मनोरंजनाचा प्रयत्न अधिक झाला हे दुर्दैव आहे. दुरदर्शनवरील महाभारताच्या मालिका बघून प्रेक्षकांच्या मनावर तातकालीन परिणाम झाला होता. त्यानंतर मात्र याव्दारे झालेले प्रबोधन प्रेक्षक विसरूनच गेले असेही त्यांनी सांगितले.प्रवचनकार व कीर्तनकारांनी या ऐतिहासिक महाकाव्याचे दैवीकरण करण्यावर अधिक भर दिल्याने त्याचा परिणाम समाजावर अत्यंत वाईट स्वरूपात झाला. यामुळे हिंदू समाजाच्या चेतना पूर्णपणे थंड झाल्या आणि कीर्तनकारांचे कीर्तन रंगले, प्रवचन खुलले आणि महाकाव्यामधील इतिहास मात्र गुदमरला याचा खेद वाटतो. परमेश्वरापेक्षा बिदागीवर लक्ष ठेवून परमार्थाचे धडे देणे म्हणजे एकप्रकारे व्यवसायच आहे.  धार्मिक क्षेत्रात काम करताना बिदागीला कमी आणि परमेश्वराला अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे; मात्र दुर्दैवाने तसे होताना अद्यापही दिसत नाही, असे घळसासी म्हणाले. यावेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सीमा हिरे, विजय कदम, राजेंद्र कलाल, प्रा. यशवंत पाटील, दौलतराव घुमरे, शिवाजी गांगुर्डे, योगेश हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.