शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
6
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
7
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
8
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
9
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
10
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
11
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
12
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
13
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
14
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
15
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
16
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
17
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
18
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
19
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
20
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या तपमानात नीचांकी घसरण

By admin | Updated: January 13, 2017 00:21 IST

तडाखा : थंडीचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत

 मालेगाव : शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदा सर्वाधिक कमी ७ अंश सेल्सिअस इतका तपमानाचा पारा घसरल्याने मालेगावकर गारठले आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून मालेगाव तालुक्यात दुष्काळाची गडदछाया पसरली होती. यंदा समाधानकारक पाऊस झाला. गिरणा-मोसम नद्यांना पूरपाणी आले. सातही लघुप्रकल्पांसह गाव तलावांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा झाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप व रब्बीच्या पिकांमध्ये वाढ केली होती.
रब्बीच्या पिकांना पोषक असे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच हिवाळ्याच्या उत्तरार्धात थंडीचा जोर वाढला आहे.
यंदाच्या तपमानातील
सर्वाधिक कमी तपमान गुरुवारी नोंदविण्यात आले. शहरातील संगमेश्वर परिसरात आलेले परप्रांतीय गरम कपडे विक्रेत्यांकडे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
हुडहुडी भरणारी थंडी असल्यामुळे नागरिक कामानिमित्तच बाहेर पडताना दिसत होते. रात्री उशिरापर्यंत थंडीचा जोर कायम होता. गेल्या १ जानेवारीपासून दररोज तपमानात घट होत आहे. येथील तपमान मोजणी केंद्रात तशी नोंद झाली आहे.
तपमानाचा घटता पारा बघता अजून थंडीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या थंडीचा फटका जनावरांनाही बसण्याची शक्यता आहे. सध्या पडत असलेली थंडी रब्बीच्या पिकांसाठी पोषक आहे. (प्रतिनिधी)