शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पिकांची हानी

By admin | Updated: March 5, 2016 22:00 IST

कळवण : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन, नुकसानभरपाईची मागणी

 कळवण : शहर व तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल, कृषी विभागाने दिरंगाई न करता युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी व कृषिपंपांचे कनेक्शन तोडू नये, अशी मागणी कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार अनिल पुरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्याने कर्ज काढून कशीबशी लागवड केली होती. मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे. पिकांवर तेल्या, प्लेग, मर, डावणी, भुरी, करपा आदि रोगांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आधीच हतबल झाला आहे. त्यात अवकाळी पावसाने द्राक्ष, भात, टमाटा, डाळिंब, द्राक्ष आदि हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच रब्बीची कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला ही पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रसने एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, गटनेते कौतिक पगार, राजेंद्र पवार, मजूर संघाचे संचालक हरिभाऊ वाघ , राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, नगरसेवक जयेश पगार, सुभाष शिरोरे, विठोबा पाटील विलास रौंदळ, रामा पाटील, सागर खैरनार, उमेश सोनवणे आदि उपस्थित होते.