माडसांगवी शिवारात ट्रकचालकाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 16:20 IST2018-12-11T16:14:32+5:302018-12-11T16:20:08+5:30
नाशिक : ऊसाचा ट्रक अडवून त्यावरील चालकास मारहाण करून त्याच्याकडील रोकड व मोबाईल दुचाकीवरील तिघा संशयितांनी लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील माडसांगवी शिवारात घडली़

माडसांगवी शिवारात ट्रकचालकाची लूट
नाशिक : ऊसाचा ट्रक अडवून त्यावरील चालकास मारहाण करून त्याच्याकडील रोकड व मोबाईल दुचाकीवरील तिघा संशयितांनी लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील माडसांगवी शिवारात घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील चांदोरी येथील ट्रकचालक लक्ष्मण बंडू कदम हे सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ऊसाचा ट्रक (एमएच १५, जी ८०७६) घेऊन जात होते़ औरंगाबादरोडवरील माडसांगवी शिवारात टोलनाक्याच्या पुढे जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी दुचाकी आडवी ट्रक थांबविली़ यानंतर या तिघांनीही ट्रकचालक कदम यांना जबर मारहाण करून त्यांच्या खिशातून एक हजार ३०० रुपयांची रोकड व मोबाईल बळजबरीने काढून घेतला़
या प्रकरणी आडगाव पोलिसांनी दुचाकीवरील तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़