करंजखेड ग्रामपंचायतीने बदलला शाळांचा लूक

By Admin | Updated: March 30, 2017 23:41 IST2017-03-30T23:40:56+5:302017-03-30T23:41:23+5:30

पेठ : तालुक्यातील करंजखेड ग्रामपंचायतीने पेसा निधीतून ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत आलेल्या तीन शाळांना संगणक, प्रोजेक्टर बसवून संपूर्ण डिजिटल लूक दिला आहे.

Look at the schools of Karanjkhad Gram Panchayat changed | करंजखेड ग्रामपंचायतीने बदलला शाळांचा लूक

करंजखेड ग्रामपंचायतीने बदलला शाळांचा लूक

 पेठ : तालुक्यातील करंजखेड ग्रामपंचायतीने पेसा निधीतून ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत आलेल्या तीन शाळांना संगणक, प्रोजेक्टर बसवून संपूर्ण डिजिटल लूक दिला आहे.
जिल्हा परिषद शाळा करंजखेड, डिकसळ व तोरणमाळ येथील डिजिटल वर्गाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित,
पंचायत समिती सदस्य विलास अलबाड यांच्या हस्ते करण्यात आला. दुर्गम भागातील मुलांनादेखील तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने करता यावा.
या उद्देशाने करंजखेडच्या सरपंच ठकूबाई मोरे व उपसरपंच रेणुका भुसारे व सदस्य यांच्या सहकार्याने पेसा निधीतून शाळा डिजिटल करण्यात आल्या.
याचा अधिकाधिक प्रभावी वापर करून मुलांचा सर्वांगीण विकास करावा, अशी यावेळी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू महाले, भाऊराव राऊत, पुंडलिक वाघमारे, ग्रामसेवक विश्वास खंबाईत, मुख्याध्यापक भरत जगताप, अमोल पवार, महाले, योगेश गाढवे, दत्ता तांगडकर, यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्ता तांगडकर यांनी सूत्रसंचलन, तर अमोल पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Look at the schools of Karanjkhad Gram Panchayat changed