लोणारवाडीचा पंचवार्षिक विकास आराखडा मंजूर

By Admin | Updated: August 24, 2016 22:27 IST2016-08-24T22:24:01+5:302016-08-24T22:27:50+5:30

लोणारवाडीचा पंचवार्षिक विकास आराखडा मंजूर

Lonarwadi's Five-Year Development Plan Approved | लोणारवाडीचा पंचवार्षिक विकास आराखडा मंजूर

लोणारवाडीचा पंचवार्षिक विकास आराखडा मंजूर

 सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी येथे ‘आमचं गाव, आमचा विकास’ अभियानांतर्गत १४ व्या वित्त आयोगातून सादर करण्यात आलेला पंचवार्षिक विकास आराखडा ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आमचं गाव, आमचा विकास अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या मशाल फेरीचे सरपंच सुमन मोरे यांच्या हस्ते उद्घाटन, तर उपसरपंच राजेंद्र भगत यांच्या हस्ते प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर प्राथमिक शाळा, अंगणवाडीसह गावातील मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. दुपारनंतर शिवार फेरी काढून जलसंधारण व शेतशिवारातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली. अंतिम प्रशासकीय मान्यतेसाठी प्रारूप आराखडा ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामसेवक योगेश पापळ यांनी आराखड्याचे वाचन केले.
याप्रसंगी पंचायत समितीच्या संसाधन गटाचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गायकवाड, जयश्री जाधव, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मिठे, चंद्रकांत झगडे, शकुंतला पोटे, जयश्री लोणारे, काशाबाई लोणारे, दीपक पांगारकर, शकुंतला गोळेसर, मनीषा पगार, सोनाली लोणारे, सुरेखा जाधव, कृषी सहायक सी. एल. पाथरे, आरोग्यसेवक राजेंद्र जाधव, माजी सरपंच राधाबाई भगत, श्रीपाद लोणारे, तलाठी शीतल पाटील, सुकदेव मिठे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Lonarwadi's Five-Year Development Plan Approved