शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ंमीराबार्इंचे जगणे म्हणजे भक्तीचा वस्तुपाठ

By admin | Updated: August 26, 2016 22:19 IST

विवेक घळसासी : सटाण्यात दादासाहेब पाटील ट्रस्टतर्फे व्याख्यानमाला

 सटाणा : दातृत्व गुण हा महिलांमध्ये नैसर्गिक व उपजतच असतो. शिवाय त्याला निष्ठेची आणि समर्पणाचीही जोड मिळून जाते. म्हणून भक्तीत महिला अग्रस्थानी असतात. यामुळेच मीराबार्इंचे जगणे म्हणजे भक्तीचा अत्युच्च वस्तुपाठ ठरतो, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले.येथील दादासाहेब तथा वसंतराव दगाजी पाटील ट्रस्टतर्फे दादासाहेबांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘कृष्णवेडी मीरा’ याविषयी बोलताना घळसासी यांनी खऱ्या भक्तीचा मार्ग दाखविला. देशभक्ती आणि देवभक्ती यात अंतर नाही. कृष्ण व्यक्ती नसून एक तत्त्व आहे. कृष्णाजवळ जाऊन कृष्णच होऊन जाणे यालाच भक्ती म्हणतात, तर अद्वैताचा अनुभव घेणारे तत्त्वज्ञान म्हणजे मीराबाई होय, असेही ते म्हणाले. आजच्या राजकारण्यांनीसुद्धा निष्ठा आणि समर्पण या गुणांचा अवलंब करण्याची गरज असून, तसे झाल्यास राजकारणाला समाजकारणाची जोड मिळून सगळ्यांचाच उत्कर्ष होईल, असे मतही त्यांनी मांडले. दरम्यान, दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ट्रस्टचे संस्थापक व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविक करताना उपक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट सांगून त्याकरिता गेल्या दशकापासून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल ऋ ण व्यक्त केले. यावेळी प्राचार्य हितेंद्र अहेर, प्रा. बी. डी. बोरसे, प्रल्हाद पाटील, प्रभाकर पाटील, श्यामकांत मराठे, समीर पाटील, प्रा. अनिल पाटील, आर. डी. देवरे, सुनील मोरे, पी. टी. गुंजाळ, डॉ. विजया पाटील, प्रा. शांताराम गुंजाळ, तुषार महाजन, जगदीश कुलकर्णी आदिंसह साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र मेतकर यांनी केले. (वार्ताहर)