शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लबच्या आॅक्टोबर सेवा सप्ताहाची सांगता

By admin | Updated: October 9, 2015 22:31 IST

लायन्स क्लबच्या आॅक्टोबर सेवा सप्ताहाची सांगता

नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक यांच्यातर्फे आॅक्टोबर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लबने ‘एक मिशन- सेवा जीवन’ या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे अनेक आरोग्य विषयक तसेच इतर सामाजिक उपक्रमांचे आयोजन या सप्ताहात केले होते. या सप्ताहाचा सांगता सोहळा बुधवार (दि.७) पंडित कॉलनी येथील लायन्स क्लब सभागृहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येऊन उपस्थिताना राष्ट्रध्वजाप्रती शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकाश पठाडे यांनी सप्ताहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला तसेच या सांगता सोहळा कार्यक्रमात लायन्स क्लब नाशिकचे अध्यक्ष उमेश सोनवणे यांनी आॅक्टोबर सप्ताहाअंतर्गत आठवडाभर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.लायन्स क्लब आॅफ नाशिक आयोजित ‘आॅक्टोबर सेवा सप्ताह’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी लायन्स क्लब आॅफ नाशिक यांच्यातर्फे घेण्यात येणारे उपक्रम अतिशय स्तुत्य असतात तसेच लायन्स क्लबच्या सदस्यांमार्फत करण्यात येणाऱ्या नियोजनामुळेच राबविण्यात येणारे उपक्रम यशस्वी होतात, असे मत व्यक्त केले. लायन्स क्लबला ५४ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बी. बी. चांडक यांनी या क्लबला शुभेच्छा दिल्या. तसेच या क्लबमधील सभासदांकडे अनुभवांचा साठा असल्याने अनेकांना या सदस्यांकडून शिकण्याची नामी संधी असल्याचे मत व्यक्त करतानाच ताण तणाव कमी करण्याच्या दिशेने लायन्स क्लबने उपक्रम राबविण्यास हवे, असे मत चांडक यांनी यावेळी व्यक्त केले.या कार्यक्रमाअंतर्गत दिंडोरी रोड येथील महाराष्ट्र टी. बी. सॅनोटोरिअम या हॉस्पिटलला किटकनाशक मशीन देणाऱ्या लायन खेतासी पटेल तसेच चुंचाळे येथील सिद्धिविनायक अपंग शाळेला अर्थिक मदत करणाऱ्या ला. महेश तिवारी आणि ला. सुभाष बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ७१ शालेय विद्यार्थ्यांना दत्तक घेणाऱ्या ला. आर्किटेक्ट सुरेश गुप्ता आणि ला. कमल गुप्ता या गुप्ता कुटुंबीयांचादेखील सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष उमेश सोनवणे, आॅक्टोबर सेवा सप्ताहाचे अध्यक्ष प्रकाश पठाडे, सचिव दीपक रत्नपारखी, खजिनदार सुरेश पाटील, माजी प्रांतपाल विनोद कपूर, अभय चोकसी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा सोनवणे आणि रत्नप्रभा पठाडे यांनी केले, तर आभार दीपक रत्नपारखी यांनी मानले. (प्रतिनिधी)