शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांबांमुळे जीवितास धोका

By admin | Updated: August 24, 2016 22:32 IST

पिंपरवाडी : वीज वितरण कंपनीचे अक्षम्य दुर्लक्ष; दुरुस्तीची मागणी

 सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) शिवारात वीज वितरण कंपनीचे खांब व विद्युत तारा अक्षरश: जमिनीवर लोळत असल्याचे चित्र असून, त्यामुळे जनावरे व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार सरपंच सविता पवार, उपसरपंच विजय गुरुळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी पिंपरवाडी शिवारात वादळी वाऱ्यामुळे ७ ते ८ विद्युत खांब वाकले होते, तर काही उन्मळून जमिनीवर पडले होते. ग्रामस्थांनीच पडलेले खांब दगडांचा आधार देत जमिनीपासून कसेबसे वर केले होते. यासंदर्भात पिंंपरवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वावी वीज उपकेंद्रात तोंडी व लेखी तक्रार केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून सदर खांब पूर्ववत करण्याची मागणी केली जात होती. मात्र त्याकडे वीज उपकेंद्राने दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे. दुरुस्तीचे काम करण्यास मुहूर्त सापडत नसल्याने व वीजवाहक तारांमध्ये विद्युतप्रवाह सुरू असल्याने धोका निर्माण झाला आहे. जमिनीवर पडलेल्या वीजवाहक तारांचा शॉक लागून भटके कुत्रे व एका वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज खांब दुरस्तीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वावी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर एका अधिकाऱ्याचीही बदली झाली. नवीन आलेल्या अधिकाऱ्यानेही अद्याप सदर बाब गांभीर्याने न घेतल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पडलेल्या विद्युत खांबांचा तलाठ्याने पंचनामा करून अहवाल पाठविला आहे. मात्र त्यानंतरही पिंपरवाडी ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. पडलेल्या विद्युत खांबामुळे व वीजवाहक तारांमुळे जीवितहानी झाल्यास वीज वितरण कंपनी जबाबदार राहील, अशा आशयाचे पत्र पिंपरवाडी ग्रामपंचायतीने वावी वीज वितरण कार्यालयास दिले आहे. वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या जीविताशी न खेळता तातडीने पडलेले विद्युतखांब व विद्युत तारांची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच सविता पवार, गुरुळे यांच्यासह श्रावण गायकवाड, कैलास काकड, गणेश गायकवाड, गोरख मुंगसे, हरिभाऊ कापसे, पोपट गुुरुळे, रतन हाडोळे, सुदाम हाडोळे, साहेबराव पवार, रामकृष्ण शिरसाट, केशव गायकवाड, प्रकाश मुंगसे, अंबादास हाडोळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)