शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदर्शी साहित्यनिर्मिती व्हावी

By admin | Updated: September 29, 2014 00:18 IST

अनिल अवचट : सावाना जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : साहित्यात संस्कृतीपुढचे प्रश्न तीव्रतेने मांडले जात नाहीत. साहित्य हे रंजनात्मक नव्हे, तर जीवनदर्शी असले पाहिजे. आपला शब्द, अनुभव आपला असला पाहिजे. माणूसपण शोषून घेणाऱ्या संस्कृतीपासून दूर राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी सावानाच्या वतीने आयोजित जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात आयोजित ४७ व्या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व एशियाटिक लायब्ररीच्या उपाध्यक्ष डॉ. मीना वैशंपायन होत्या. यावेळी अनिल अवचट यांनी ‘साहित्यावर बोलू काही’ या विषयावर बोलताना सांगितले, आपण समाजात जितके खोलवर जाऊन वेध घेऊ तितके साहित्य सकस होणार आहे. दुसऱ्यांचे जीवन जाणण्याची संवेदना माणसात आहे. महाराष्ट्राबाहेरील प्रेमचंद, शिवराम कारंथ यांसारख्या लेखकांच्या साहित्यात माणसांचे अस्सल चित्रण दिसून येते. आपल्या मराठी साहित्यात ते अलीकडे आले. निसर्गाचा रसरशीतपणाही आपल्या साहित्यात नाही. पूर्वी फडके-खांडेकर यांच्यापलीकडे साहित्य जात नव्हते. १९६० नंतर बांध मोकळे झाले. दलित आत्मनिवेदनानंतर एक चांगली कादंबरी दिसून येत नाही. आपल्याकडे लांब पल्ल्याचे घोडे का निर्माण होत नाहीत, असा प्रश्नही अवचट यांनी उपस्थित केला. संस्कृतीचे वस्त्र रक्ताच्या डागाने डागाळलेले आहे. कल्पक माणसाचे रूपांतर ग्राहकात झाले आहे. अंधानुकरण हा एक मंत्र झाला आहे. साहित्यात समाजाला पुढची दिशा दाखविण्याचे काम झाले पाहिजे. भाषांतरित चांगले साहित्य आले पाहिजे. दुर्दैवाने त्यात सनसनाटीपणाच अधिक दिसून येतो. मातृभाषेतून संस्कृतीचे वहन होत असते. एका संस्कृतीचे भरणपोषण झाले की दुसरी संस्कृती स्वीकारता येते. मराठी माध्यमाच्या शाळा जगल्या पाहिजे, असा आग्रहही अवचट यांनी धरला. प्रारंभी अवचट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अवचट यांचा परिचय अरुण ठाकूर यांनी करून दिला. व्यासपीठावर मेळाव्याचे मावळते अध्यक्ष कवी खलील मोमीन, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)