शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

सुरक्षित पाण्यासाठी राज्यातील युनिसेफकडून धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 1:33 AM

कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यानुसार पाण्यातील गुणवत्तेतदेखील परिणाम होत असतो. पाण्याची गुणवत्ता आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी शासनाचा पाणीपुरवठा विभाग आणि युनिसेफच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना धडे दिले जात आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : ३४ जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची उपस्थिती

नाशिक : कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यानुसार पाण्यातील गुणवत्तेतदेखील परिणाम होत असतो. पाण्याची गुणवत्ता आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी शासनाचा पाणीपुरवठा विभाग आणि युनिसेफच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना धडे दिले जात आहेत.महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि युनिसेफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण या विषयावर महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शहरात दोनदिवसीय कार्यशाळेस प्रारंभ झाला आहे. दोनदिवसीय कार्यशाळेत पाण्याची उपयुक्तता वाढविण्यावरील तंत्रज्ञान आणि उपचारांवर भर दिला जाणार आहे.पाण्याची गुणवत्ता त्यामध्ये मिसळलेल्या विद्राव्य किंवा अविद्राव्य घटकांमुळे ठरत असते. अनेक कारणांनी होणारे पाण्याचे प्रदूषण ते पिण्यासाठी किंवा दैनंदिन वापरासाठी दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याने पाणी सुरक्षिततेविषयी व्यापक जागृती केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दोनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेस प्रारंभ झाला आहे.सदरच्या प्रशिक्षण कार्यशाळेत युनिसेफचे युसूफ कबीर यांनी पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत राज्यात सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. पाणी गुणवत्ता विषयात जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.पाणी व स्वच्छता विभागाचे पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ. शैलेश कानडे यांनी पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण कार्यक्र मांतर्गत शासनाच्या वतीने सुरू असलेल्या कामांची माहिती दिली व प्रत्येक गावाचा पाणी सुरक्षितता आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. कार्यशाळेत पाणी गुणवत्ताबाबतीत सर्वेक्षणावर भर देण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण, जैविक पाणी नमुने तपासणी, प्रयोगशाळा मनुष्यबळ, तसेच ग्रामपंचायत स्तरावरील जलसुरक्षक या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे डॉ. शैलेश कानडे, युनिसेफचे युसूफ कबीर, आनंद घोडके, आय.आर.ए.एफ. हैदराबादचे नितीन बस्सी, मंदार साठे, तसेच सर्व जिल्हा परिषदांमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा आरोग्य अधिकारी, पाणीगुणवत्ता सल्लागार, पाणी गुणवत्ता निरीक्षक, वरिष्ठ रसायनी आदी उपस्थित होते.देशभर होणार पाहणीपिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण फक्त महाराष्ट्रात होत असून त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याने सदर सर्वेक्षण देशपातळीवर होण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या आय.आर.ए.एफ. हैदराबाद कंपनीकडून १८ जिल्ह्यांची पाहणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी दोन टप्प्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सुरक्षित पाण्यासाठी राज्यातील युनिसेफकडून धडेजिल्हा परिषद : ३४ जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची उपस्थितीनाशिक : कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यानुसार पाण्यातील गुणवत्तेतदेखील परिणाम होत असतो. पाण्याची गुणवत्ता आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी शासनाचा पाणीपुरवठा विभाग आणि युनिसेफच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना धडे दिले जात आहेत.महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि युनिसेफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण या विषयावर महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शहरात दोनदिवसीय कार्यशाळेस प्रारंभ झाला आहे. दोनदिवसीय कार्यशाळेत पाण्याची उपयुक्तता वाढविण्यावरील तंत्रज्ञान आणि उपचारांवर भर दिला जाणार आहे.पाण्याची गुणवत्ता त्यामध्ये मिसळलेल्या विद्राव्य किंवा अविद्राव्य घटकांमुळे ठरत असते. अनेक कारणांनी होणारे पाण्याचे प्रदूषण ते पिण्यासाठी किंवा दैनंदिन वापरासाठी दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याने पाणी सुरक्षिततेविषयी व्यापक जागृती केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दोनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेस प्रारंभ झाला आहे.सदरच्या प्रशिक्षण कार्यशाळेत युनिसेफचे युसूफ कबीर यांनी पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत राज्यात सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. पाणी गुणवत्ता विषयात जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.पाणी व स्वच्छता विभागाचे पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ. शैलेश कानडे यांनी पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण कार्यक्र मांतर्गत शासनाच्या वतीने सुरू असलेल्या कामांची माहिती दिली व प्रत्येक गावाचा पाणी सुरक्षितता आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. कार्यशाळेत पाणी गुणवत्ताबाबतीत सर्वेक्षणावर भर देण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण, जैविक पाणी नमुने तपासणी, प्रयोगशाळा मनुष्यबळ, तसेच ग्रामपंचायत स्तरावरील जलसुरक्षक या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे डॉ. शैलेश कानडे, युनिसेफचे युसूफ कबीर, आनंद घोडके, आय.आर.ए.एफ. हैदराबादचे नितीन बस्सी, मंदार साठे, तसेच सर्व जिल्हा परिषदांमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा आरोग्य अधिकारी, पाणीगुणवत्ता सल्लागार, पाणी गुणवत्ता निरीक्षक, वरिष्ठ रसायनी आदी उपस्थित होते.देशभर होणार पाहणीपिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण फक्त महाराष्ट्रात होत असून त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याने सदर सर्वेक्षण देशपातळीवर होण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या आय.आर.ए.एफ. हैदराबाद कंपनीकडून १८ जिल्ह्यांची पाहणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी दोन टप्प्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी