सामनगावचा बिबट्या बोरिवलीला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:37 IST2020-07-15T14:33:17+5:302020-07-15T14:37:13+5:30
या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

सामनगावचा बिबट्या बोरिवलीला रवाना
नाशिक : सामनगावात जेरबंद करण्यात आलेल्या मध्यम वयाच्या नर बिबट्याची रवानगी नाशिक पश्चिम वनविभागाकडून बुधवारी (दि.१५) सकाळी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली. या पंधरवड्यात हा दुसरा बिबट्या शहरातून या उद्यानात पोहचला.
दारणाकाठावरील सामनगाव ते थेट दोनवाडेपर्यंत विविध गावांमधील ऊसशेतीत बिबट्यांचा मुक्त संचार आहे. यामुळे या भागात सर्वच गावांमध्ये पिंजऱ्यांचे सापळे रचण्यात आले आहे. सामनगावात एका शेतजमीनीजवळ लावलेल्या पिंजयात भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेल्या कमी वयाचा नर बिबट्या सोमवारी (दि.१३) पहाटे अडकला. या बिबट्याला दोन दिवस वनविभागाकडून ‘पाहूणचार’ करण्यात येऊन बुधवारी सकाळी गांधी उद्यानात त्याची रवानगी करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली. दहा ते बारा दिवसांपुर्वी जाखोरी येथे लावलेल्या पिंजºयात जेरबंद झालेली प्रौढ मादीला देखील गांधी उद्यानात ठेवण्यात आले आहे. या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, यामुळे सध्या पुढील किमान दोन महिने तरी हे दोन्ही बिबटे या उद्यानाचा ‘पाहूणचार’ घेणार आहे.