शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सुदैवाने प्राण वाचले : चेहडी शिवारात बिबट्याचा मुलावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:05 IST

जखमी आयुषच्या मानेला व डोक्याला बिबट्याच्या हल्ल्यात दुखापत झाली असून त्याच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती स्थितर असून तत्काळ सातपुते मळ्याच्या भागात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.

ठळक मुद्देदारणा खो-यातील गावे दहशतीखालीसातपुते मळ्याच्या भागात पिंजरा लावण्यात येणार

नाशिक: दारणा नदीच्या खोऱ्यात बिबट्याकडून हल्ले सुरूच आहे. शनिवारी (दि.४) रात्री आठ वाजेच्या सुमारास सातपुते मळ्यात अंगणात खेळणा-या नऊ वर्षीय आयुष जयंत सातपुते या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातली; मात्र सुदैवाने त्याचे प्राण वाचले. बिबट्याने पंजा मारल्यामुळे आयुष जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकरोडच्या बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत.दारणा नदीकाठालगतच्या गावांमधील बिबट्यांचा मुक्त संचार सुरूच असून या भागातील दहशत काही करेना कमी होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. पशुधनासह लहान मुलांवर बिबट्याकडून होणारे हल्ले यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि.३०) कोटमगावात एका १४ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गुरूवारी (दि.२) जाखोरीत एका पिंजºयात बिबट्याची प्रौढ मादी जेरबंद झाली. यानंतर दोन दिवसांतच बिबट्याने जाखोरीपासून जवळच असलेल्या चेहडी शिवारातील सातपुते मळ्यात चिमुकल्यावर हल्ला केला. तसेच शिंदे गावातील चिंचोळी फाटा परिसरात सांगळे वस्तीवर एका वासराला बिबट्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ठार केल्याची घटना घडली. या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सामनगावात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्येही बिबट्याची मुक्त भटकंती कैद झाली आहे.या भागात सातत्याने वनविभागाचे पथके कार्यरत आहेत. जखमी आयुषच्या मानेला व डोक्याला बिबट्याच्या हल्ल्यात दुखापत झाली असून त्याच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती स्थितर असून घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ सातपुते मळ्याच्या भागात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.-

दारणा खो-यातील ही गावे दहशतीखालीबिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पथकांकडून अथक परिश्रम घेतले जात आहेत; मात्र दारणा नदीच्या खोºयालगतच्या चेहडी, एकलहरे, हिंगणवेढे, बाभळेश्वर, मोहगाव, शिंदे, पळसे, शेवगेदारणा, जाखोरी, कोटमगाव, भगूर, दोनवाडे या सर्व गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे.

 

 

 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव