विधान परिषद वाद, सुनावणी पूर्ण

By Admin | Updated: October 15, 2014 00:37 IST2014-10-15T00:11:54+5:302014-10-15T00:37:09+5:30

विधान परिषद वाद, सुनावणी पूर्ण

Legislative Council Debate, Full Hearing | विधान परिषद वाद, सुनावणी पूर्ण

विधान परिषद वाद, सुनावणी पूर्ण

  नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक संस्था मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात शिवसेनेचे पराभूत उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून, दिवाळीनंतर निकाल लागण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयंत जाधव आणि शिवाजी सहाणे यांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने निकाल लावण्यात आला आणि त्यात जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले होते. तथापि, आपली वैध मते हेतुपुरस्सर बाद ठरविल्याची तक्रार अ‍ॅड. सहाणे यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावर सुरू असलेली सुनावणी आता पूर्ण झाली असून, दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्याने आता दिवाळीनंतर निकाल लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Legislative Council Debate, Full Hearing