दुपारनंतर स्लम भागात जोर वाढला

By Admin | Updated: October 16, 2014 18:59 IST2014-10-16T00:28:23+5:302014-10-16T18:59:52+5:30

दुपारनंतर स्लम भागात जोर वाढला

Later in the afternoon, the slum got increased in the afternoon | दुपारनंतर स्लम भागात जोर वाढला

दुपारनंतर स्लम भागात जोर वाढला

 

पंचवटी : पूर्व विधानसभा मतदारसंघात असलेल्या स्लम भागात दुपारनंतर मतदानाचा जोर वाढल्याचे चित्र दिसून आले. सकाळच्या सुमारास ओस पडलेले मतदान केंद्र दुपारी साडेचारनंतर भरगच्च होऊ लागले. एकीकडे मतदान केंद्र भरगच्च, तर दुसरीकडे गल्लीबोळात कार्यकर्त्यांच्या गर्दीने परिसर भरून गेला होता.
पंचवटीतील राजवाडा, फुलेनगर, पेठरोड, दिंडोरीरोड, पंचवटी गावठाण परिसर या भागातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले, तर शेकडो मतदारांना लक्ष्मीदर्शनाचा लाभ झाल्यानेच मतदार खऱ्या अर्थाने घराबाहेर पडल्याची चर्चा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. दुपारच्या वेळी काही वेळेला ओस पडलेले मतदान केंद्र सायंकाळनंतर भरगच्च झाल्याचे चित्र पंचवटी परिसरात दिसून आले, तर मतदानासाठी आलेले काही मतदार ज्या त्या भागातील कार्यकर्त्यांभोवती गराडा घालून मतदान चिठ्ठ्या दाखवून आमचे एवढे मतदान आहे कोणाला भेटू अशी विचारणा करीत असल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत होत होती. (वार्ताहर)

Web Title: Later in the afternoon, the slum got increased in the afternoon