शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सव तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: September 26, 2016 01:44 IST

महापालिका निवडणुकीमुळे महत्त्व प्राप्त

इंदिरानगर : परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाच्या वर्षी महापालिका निवडणुकीमुळे नवरात्रोत्सवास विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. युनिक ग्रुपच्या वतीने गतवर्षीप्रमाणे यंदाही युवती व महिलांसाठी दांडियाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच आॅक्रेस्ट्राबरोबरच गायक आणि बक्षिसांची लयलूट करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश सोनवणे यांनी सांगितले.गणेश युवक मित्रमंडळ व राजे छत्रपती युवक मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने कलानगर येथे दांडियाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी उत्कृष्ट दांडिया खेळणारे, उत्कृष्ट वेशभूषा, बेस्ट कपलसह विविध बक्षिसे देण्यात येणार असल्याचे गणेश जाधव व ऋषी वर्मा यांनी सांगितले. परिसरात दांडियाची सुरुवात करणाऱ्या सह्याद्री युवक मित्रमंडळाच्या वतीने यंदा राणेनगर येथील मैदानावर दांडिया रासचे आयोजन करण्यात येणार आहे. दांडियाप्रेमींना आकर्षित करण्यासाठी बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. तसेच हुल्लडबाजी टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक व युवकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे अमोल जाधव यांनी सांगितले. चेतनानगर येथे बाजीराव फाउंडेशनच्या वतीने सुमारे पाच वर्षांपासून दांडियाचे आयोजन करण्यात येत आहे. शिस्तबद्ध दांडिया आणि दररोज दांडियाप्रेमींना बक्षिसे देण्यात येतात, असे साहेबराव आव्हाड यांनी सांगितले. पांडवनगरीमध्ये गेल्या चार वर्षांपासून नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने दांडियाचे आयोजन करण्यात येत आहे. वाद्यवृंदाच्या व गायकांच्या तालावर दांडियारास दांडियाप्रेमी खेळतात, असे योगेश दिवे यांनी सांगितले. दीपालीनगर येथे श्रीसाईराम सामाजिक व बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दांडियामध्ये दररोज लकी ड्रॉ द्वारे एक पैठणी व इतर बक्षिसे देण्यात येणार आहेत, असे चंद्रकांत बोंबले यांनी सांगितले. दरम्यान, इंदिरानगर परिसरात इच्छुक उमेदवारांकडून नवरात्रोत्सवाच्या हालचाली जोमाने सुरू झाल्या आहेत. यामध्ये आॅर्केस्ट्रा, गायन, सिनेकलावंत शो यांची लयलूट करण्यात येणार आहे. त्यामुळे दांडियाप्रेमींची आणि मंडळांची दिवाळीच साजरी होणार आहे. (वार्ताहर)