शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या दिवशी इच्छुकांची झुंबड

By admin | Updated: February 7, 2017 01:16 IST

शक्तिप्रदर्शन : मालेगावी गटासाठी ५६, गणासाठी १०५ अर्ज; सिन्नरमध्ये गटासाठी ५४, गणासाठी १११ अर्ज

नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या आज, सोमवारी अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी समर्थकांसह मोठी गर्दी केल्याने तहसील कार्यालये गजबजून गेली होती. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेस, रिपाइं यांच्यासह इतर पक्षांच्या इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले.  मालेगाव : आज येथील प्रांत कार्यालयात जिल्हा परिषदेच्या सात गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी नामांकन अर्ज दाखल केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकूण १६१ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. आज अखेरच्या दिवशी ८५ इतके विक्रमी नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. या प्रक्रियेमुळे प्रांत कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.मालेगाव तालुक्यातील सात गट व १४ गणांसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सकाळपासूनच येथील प्रांत कार्यालयात इच्छुकांनी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी नामांकन अर्ज स्वीकारले. जिल्हा परिषदेच्या गटासाठी आज अखेरच्या दिवशी ५६, तर गणासाठी २९ असे एकूण ८५ अर्ज दाखल झाले तर आज अखेर गटासाठी दाखल झालेल्या नामांकन अर्जांची संख्या ५६ झाली आहे, तर पंचायत समिती गणांसाठी दाखल झालेल्या इच्छुकांच्या अर्जांची संख्या १०५ इतकी विक्रमी झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकूण १६१ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी, ११ वाजेनंतर येथील प्रांत कार्यालयात दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. (लोकमत ब्युरो)सिन्नरला समर्थकांची गर्दीजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात इच्छुकांची अक्षरश: झुंबड उडाली. यावेळी कार्यकर्त्यांची तहसील कार्यालयात जत्रा भरल्याचे चित्र होते.सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी १० वाजेपासूनच तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाच्या तालुकाध्यक्षांसह नेत्यांनी गर्दी केली होती.  राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, बाळासाहेब वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पत्नी सीमा कोकाटे, बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, उपसभापती सोमनाथ भिसे, नगरसेवक रामभाऊ लोणारे, विजय काटे, शिवसेनेचे नगरसेवक विजय जाधव, शैलेश नाईक, पिराजी पवार, अवधूत आव्हाड, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, रासपाचे नीलेश जगताप, सुनील काटे यांच्यासह नेते व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठाण मांडल्याचे दिसून आले.शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सहा गटातून ४३, तर गणांसाठी ७८ अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकूण दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या गटासाठी ५४, तर गणांसाठी १११ झाली आहे. उद्या, मंगळवारी (दि. ७) उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.  दरम्यान, दुपारी अडीच वाजेनंतर सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण आहे हे स्पष्ट झाले.