बॅण्ड पथकाच्या गाडीला आग लागल्याने मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:12 IST2019-07-12T00:07:14+5:302019-07-12T00:12:06+5:30
सटाणा ताहाराबाद रस्त्यावरील ढोलबारे गावाजवळ बॅण्ड पथकाच्या चालत्या गाडीला अचानक आग लागल्याने गाडी व वाद्ये तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. गाडीत बसलेल्या बॅण्ड पथकातील कलाकारांनी गाडी थांबताच गाडीतून वेळीच उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला.

शॉर्टसर्किटमुळे बॅण्ड पथकाच्या गाडीला लागलेली आग.
जायखेडा : सटाणा ताहाराबाद रस्त्यावरील ढोलबारे गावाजवळ बॅण्ड पथकाच्या चालत्या गाडीला अचानक आग लागल्याने गाडी व वाद्ये तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. गाडीत बसलेल्या बॅण्ड पथकातील कलाकारांनी गाडी थांबताच गाडीतून वेळीच उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघात बॅण्डमालकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
तरसाळी तालुका बागलाण येथील स्वर संगीत बॅण्ड पथकाची मिनी ट्रक (क्र . एम. एच.१५जी ३६९७) दहा ते पंधरा कलाकारांना घेऊन तालुक्यातील बिजोटे येथे लग्न समारंभासाठी जात असताना ढोलबारे गावाच्या म्हसोबा मंदिराजवळील वळण रस्त्यावर गाडीत अचानक अंतर्गत शॉर्टसर्किट होऊन आग लागली. ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवित गाडी तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवून सर्वांना खाली उतरण्याच्या सूचना केल्या. पथकातील कलाकारांनी तातडीने उद्या मारून जीव वाचिवला.