शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांच्या जमिनी आदिवासी विभागाच्या नावावर करणार; अनलॉक लर्निंगही सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 02:24 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी अनुदान वाटप केले जाते. त्यादृष्टीने सर्वेक्षणाचे कामकाज सुरू असून, त्यासाठीचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. 

संजय दुनबळे नाशिक : आश्रमशाळांच्या जमिनी आदिवासी विभागाच्या नावावर करण्याचा संकल्प आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी सोडला आहे. त्यांनी नुकताच आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मंत्रालय स्तरावर काम करण्याचा अनुभव असलेल्या सोनवणे यांनी आपल्या कार्यकाळात विविध कामे पूर्ण करण्याचा विश्वास ‘लोकमत’शी साधलेल्या संवादात व्यक्त केला. 

राज्यातील आदिवासी बांधवांना खावटी कर्ज केव्हा मिळणार ? महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी अनुदान वाटप केले जाते. त्यादृष्टीने सर्वेक्षणाचे कामकाज सुरू असून, त्यासाठीचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत.  त्याची छाननी करून लवकरात लवकर साहित्य खरेदी करून त्याच्या वाटपास सुरुवात होईल. राज्य शासनाने ११ लाख ५५ हजार लाभार्थ्याना मंजुरी  दिली आहे. त्यात थोडीफार वाढ होऊ शकते. या योजनेत आदिम जमाती, भूमिहीन यांच्याबरोबरच शहरी भागात राहणाऱ्या आदिवासींनाही लाभ देण्यात येणार आहे. 

आपण कोणत्या कामाला प्राधान्य देणार आहात ? राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृह आहेत. काही ठिकाणी या इमारती ज्या जागेवर उभ्या आहेत त्या जागेच्या सातबारा उताऱ्यावर आदिवासी विभागाची कोणतीही नोंद नाही. या जागा काही ठिकाणी दान दिल्या आहेत तर काही बक्षीसपत्र करून दिल्या आहेत. या सर्व जागांचे कागदपत्र जमा करून त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यास  प्राधान्य देणार आहे. संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. ही कामे जिल्हास्तरावर केली जातील. काही कामांमध्ये आयुक्तालयाची मदत लागल्यास त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. अधिकाधिक जमिनींवर आदिवासी विभागाची नोंद करण्याचे उद्दिष्ट आहे. अनेक आश्रमशाळांना संरक्षक भिंती नाहीत, त्या बांधण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय काही ठिकाणी भाडेतत्त्वावरील इमारतीत वसतिगृह सुरू आहेत. तेथे जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी करून आदिवासी विभागाच्या मालकीची वसतिगृह बांधण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.

मुख्याध्यापकांना खरेदीचे अधिकारआश्रमशाळा सुरू होत असताना आता आरोग्य दक्षतेबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. सॅनिटाझयर, ऑक्सिमीटर, थर्मल गन असे सर्व साहित्य खरेदीचा अधिकार केंद्रीय स्तरावर न ठेवता स्थानिक पातळीवर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सोनवणे यांंनी सांगितले.

अनलॉक लर्निंगही सुरू राहणार

  • राज्य शासनाच्या निर्देशानुसार आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. 
  • शाळेत येऊ न शकणाऱ्या मुलांसाठी अनलॉक लर्निंगचा उपक्रम सुरूच राहणार असून, संबंधित शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या गावांना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणींचे निराकरण करण्यावर भर असेल, असे त्यांनी सांगितले.