शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

पारावरच्या गप्पा झाल्या कमी

By admin | Updated: September 16, 2014 00:07 IST

पारावरच्या गप्पा झाल्या कमी

खामखेडा : पूर्वी दिवसभर शेतात काम करून सायंकाळी घरी आल्यानंतर जेवण झाले की, गावातील पुरुषमंडळी गावाच्या मंदिराजवळ पारावर एकत्र येऊन गप्पा मारत असे. उत्तरोत्तर रंगणाऱ्या गप्पांचे चित्र ग्रामीण भागांमध्ये दुर्मीळ होत आहे.पूर्वीपासून गावाच्या मंदिराजवळ पार असे. तेथे पिंपळ किंवा वडाचे झाडाखाली बांधकाम करून पार तयार करण्यात येत असे. दिवसभर गावातील वृद्धमंडळी तेथे जमत तर काही माणसे गप्पा करीत असे.ग्रामीण भागातील दिवसभर शेतात काम करणारा शेतकरी व्यापार व नोकरीनिमित्ताने परगावी ये - जा करू लागला. व्यापारी व नोकरदार सायंकाळी गावी यायचे. रात्री जेवण झाल्यानंतर ही पुरुष मंडळी पारावर एकत्र यायचे तेथे दिवसभरातील घडामोडींवर चर्चा व्हायची अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाची चर्चा रंगायची.आता परिस्थिती बदलली आहे. गावातील पाराची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. आता शेतकरी व्यवसाय असल्यामुळे शेतकरी शेतामध्ये वास्तव्य करून राहू लागला आहे. घरामध्ये करमणुकीची साधने वाढली आहेत. काही नोकरदार शहरामध्ये राहू लागले. ग्रामीण भागामध्ये वाडी, वस्तीवर सॅटेलाईट छत्र्या पोहोचल्या आहेत. त्यामुळे ताज्या घडामोडींच्या बातम्या, मनोरंजनाची साधने वाढली आहेत. अनेक मालिका दाखवल्या जाऊ लागल्या आहे. त्यामुळे जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडणारी पुरूषमंडळी आता दूरदर्शन संचासमोर बसू लागली आहे. आजच्या संगणकाच्या युगामध्ये कोणाला ऐकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. यामुळे पारावरील गप्पा दुर्मीळ झाल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)