१५० वृक्षांवर कोसळणार कुऱ्हाड

By Admin | Updated: March 31, 2017 01:01 IST2017-03-31T01:01:41+5:302017-03-31T01:01:58+5:30

नाशिक : महापालिकेने गंगापूररोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांवर अखेर कुऱ्हाड चालविण्यास गुरुवारी (दि.३०) प्रारंभ करण्यात आला.

Kurhad to fall on 150 trees | १५० वृक्षांवर कोसळणार कुऱ्हाड

१५० वृक्षांवर कोसळणार कुऱ्हाड

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ हजार रोपांच्या लागवडीची पूर्तता केल्यानंतर महापालिकेने गंगापूररोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांवर अखेर कुऱ्हाड चालविण्यास गुरुवारी (दि.३०) प्रारंभ करण्यात आला. या रस्त्यावरील सुमारे दीडशे झाडे महापालिकेकडून हटविण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी आठ ते दहा झाडे महापालिकेकडून हटविण्यात आली.
गंगापूररोडवरील झाडे वाचविण्याबाबत वृक्षप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, परिसरातील रहिवाशांनी देखील वृक्षप्रेमींविरुद्ध आंदोलन पुकारत थेट उच्च न्यायालयाकडे पत्रे पाठविण्याचे अभिनव आंदोलन केले होते.
यावर निर्णय देताना न्यायालयाने महापालिकेला शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे शहरातील अकराशे झाडे तोडण्यासंदर्भात फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले होते. यामध्ये सुमारे सातशे वृक्ष वाचविण्यात आल्याचा पालिकेचा दावा असून, शहरातील पावणे चारशे वृक्ष हटविण्याची मोहीम न्यायालयाच्या आदेशान्वये हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील दीडशे झाडांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kurhad to fall on 150 trees