शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महोत्सव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:15 IST

दिंडोरी : येथील श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषी ...

दिंडोरी : येथील श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषी महोत्सवास शुक्रवार ( दि. २२) पासून प्रारंभ झाला आहे. महोत्सवाचे उद‌्घाटन सेवामार्गाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते माती पूजन करून झाले. यंदाचा कृषी महोत्सव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर तब्बल ११०० ठिकाणी होणार आहे.

उद‌्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून कल्पना सरोज, खासदार हेमंत गोडसे, नगराध्यक्षा रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, नगरसेवक प्रमोद देशमुख, माधवराव साळुंके, दिलीप जाधव, गुलाब जाधव, सुनील आव्हाड, सतीश देशमुख, नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी दरवर्षीप्रमाणे वनारवाडी येथील शेतकरी जोडप्याचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी कृषी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले तर अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले, शेतीतील कृषितंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एकाच वेळी ११०० ठिकाणी हा उपक्रम सुरू होत आहे. जास्त गर्दी न करता काेरोनाबाबत सरकारचे सर्व नियम पाळून याची सुरुवात केली आहे. साठी उलटलेला शेतकरी आजही शेती करतो मात्र तरुण फारसा याकडे वळत नाही. स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने कृषी मेळावा घेतला जातो. सत्संग घेतला जात नाही. गेल्या ४०-५० वर्षांपासून केंद्राच्या वतीने ग्रामाभियान सुरू करून सज्ञान व सुदृढ पिढी निर्माण करण्याचे कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कृषी महोत्सवात ऑनलाईन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी आभार मानले.

इन्फो

११ लाख शेतकरी जोडणार

अण्णासाहेब मोरे यांनी यावेळी स्वामी समर्थ केंद्राच्यावतीने राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मोरे म्हणाले, विवाह मंडळाकडे ४० हजार विवाहेच्छुक मुलामुलींची ऑनलाईन नोंद झालेली आहे. शेतकऱ्यांकडे स्वतःचे बियाणे नाही. त्यामुळे शाकंभरी बीज भांडार या उपक्रमातून ७०० पेक्षा जास्त देशी बियाण्यांचे संवर्धन व संकलन केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला हा कृषी महाेत्सव जगभरात पोहचला असून किमान ११ लाख शेतकरी यात जोडले जाणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले.

फोटो- २२ कृषी महोत्सव-१

कृषी महोत्सवानिमित्त काढण्यात आलेली कृषी ग्रंथ दिंडी.

फोटो- २२ कृषी महोत्सव-२

अण्णासाहेब मोरे

===Photopath===

220121\22nsk_23_22012021_13.jpg~220121\22nsk_24_22012021_13.jpg

===Caption===

फोटो- २२ कृषी महोत्सव-१कृषी महोत्सवानिमित्त काढण्यात आलेली कृषी ग्रंथ दिंडी. ~फोटो- २२ कृषी महोत्सव-२अण्णासाहेब मोरे