इस्लामाबाद भागातून मुलीचे अपहरण

By Admin | Updated: January 8, 2015 00:09 IST2015-01-08T00:06:43+5:302015-01-08T00:09:17+5:30

इस्लामाबाद भागातून मुलीचे अपहरण

Kidnapping of girl in Islamabad area | इस्लामाबाद भागातून मुलीचे अपहरण

इस्लामाबाद भागातून मुलीचे अपहरण


मालेगाव : शहरातील रविवार वॉर्ड इस्लामाबाद भागातील शाळकरी मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण करून पळवून नेल्याची फिर्याद पीडित मुलीच्या पित्याने किल्ला पोलिसांत दिली. इस्लामाबाद भागात शब्बीर डेगवाले यांचे यंत्रमाग कारखान्याजवळ काल सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सदर मुलगी शाळेचे दप्तर घेऊन घरातून निघाली होती. डेगवाले यांचे कारखान्याजवळ मुलीचे दप्तर पडलेले आढळून आले. पालकांनी तिचा शोध घेतला असता कुठेही मिळून आली नाही. कुणीतरी अज्ञात इसमाने तिचे अपहरण केल्याची फिर्याद शाहीद अख्तर रफीक यांनी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
 

Web Title: Kidnapping of girl in Islamabad area