शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या निधीची बिगर आदिवासी भागात खैरात

By admin | Updated: April 2, 2016 00:08 IST

चौकशीची मागणी : एकाच तालुक्यात सर्वाधिक निधी

 नाशिक : आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी तालुक्यांमधील बंधाऱ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने उपलब्ध करून दिलेला सुमारे साडेतीन कोटींचा निधी जिल्हा परिषद अध्यक्षांनी परस्पर बिगर आदिवासी तालुक्यांमध्ये वळविल्याचा आरोप कॉँग्रेसचे गटनेते संपतराव सकाळे यांनी केला आहे.विशेष म्हणजे या कोट्यवधीच्या निधीतील दीड ते दोन कोटींचा निधी एकट्या बागलाण तालुक्यात वळविण्यात आला असून तो एका ठरावीक ठेकेदाराला दिल्याने सदस्यांमध्ये ‘चलबिचल’ वाढली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी उपाध्यक्ष तथा कॉँग्रेस गटनेते संपतराव सकाळे यांनी केली आहे. आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारण व जलपुनर्भरण योजनांच्या माध्यमातून लहान मोठी बंधारे व सिमेंट बंधारे बांधण्यासाठी सुमारे साडेतीन कोटींचा निधी राखीव ठेवला होता; मात्र काही दिवसांपूर्वी हा निधी अचानक बिगर आदिवासी तालुक्यात वळविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे आपल्या कानावर आले होते. आता दोन-तीन दिवसांपूर्वीच यातील ७० ते ८० टक्के निधी कसमा पट्ट्यात वळविण्यात आला असून त्यात मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण घडामोडी झाल्याचा आरोप संपतराव सकाळे यांनी केला आहे.मुळातच आदिवासी बांधवाच्या पाण्याच्या सोयीसाठी हा निधी शासनाने आदिवासी विकास विभागाला वितरित केलेला असताना तो आदिवासी विकास विभागातील संबंधित अधिकारी व जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने बिगर आदिवासी भागात का वळविण्यात आला? त्याची चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी संपतराव सकाळे यांनी केली आहे. या सर्व प्रकरणात बागलाण तालुक्यातील मक्तेदारांसाठी कामे मिळवून देणाऱ्या एका नेत्र ‘दीपक’ ठेकेदाराभोवती संशयाची सूई व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)