शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

खैराच्या अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 1:19 AM

गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिकच्या हरसूल वनपरिक्षेत्र हद्दीतील चिंचओहोळ वनपरिमंडळातील शेवगापाडा येथून खैराच्या वृक्षांची चोरटी तोड करून बुंधे मोठ्या संख्येने वाहून थेट गुजरात सीमेच्या दिशेने एका टेम्पोतून नेले जात होते. याबाबत वनविभागाच्या गस्तीपथकाला माहिती मिळताच पथकाने रात्रीच्या अंधारात टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करत खैराच्या वाहतुकीला ‘ब्रेक’ लावला; मात्र चोरटे निसटून जाण्यास यशस्वी ठरले. टेम्पोतून (जी. जे. १७ टी ७६०६) खैराचे सुमारे ४१ नग जप्त करण्यात आले असून, सुमारे दीड लाख रु पयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहरसूल वनपरिक्षेत्र : गुजरातच्या टोळीची घुसखोरी; दीड लाखाचा साठा जप्त

नाशिक : गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिकच्या हरसूल वनपरिक्षेत्र हद्दीतील चिंचओहोळ वनपरिमंडळातील शेवगापाडा येथून खैराच्या वृक्षांची चोरटी तोड करून बुंधे मोठ्या संख्येने वाहून थेट गुजरात सीमेच्या दिशेने एका टेम्पोतून नेले जात होते. याबाबत वनविभागाच्या गस्तीपथकाला माहिती मिळताच पथकाने रात्रीच्या अंधारात टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करत खैराच्या वाहतुकीला ‘ब्रेक’ लावला; मात्र चोरटे निसटून जाण्यास यशस्वी ठरले. टेम्पोतून (जी. जे. १७ टी ७६०६) खैराचे सुमारे ४१ नग जप्त करण्यात आले असून, सुमारे दीड लाखरु पयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चिंचओहोळ-शेवगापाडा भागातून अवैधरीत्या तोडलेल्या खैराच्या वृक्षाचे बुंधे वाहून नेले जाणार असल्याची गोपनीय माहिती वनरक्षक किरण गवळी, राजेंद्र चौधरी, उमेश भोये, पोपट राऊत, वाहनचालक संजय भगळे यांच्या पथकाला मिळाली. तत्काळ गवळी व चौधरी यांनी आपले गस्ती वाहन भगळे यांना घटनास्थळाच्या दिशेने घेण्यास सांगितले. दरम्यान, शेवगापाडा फाटा येथे सर्वप्रथम त्यांनी सापळा रचला असता तस्करांचे वाहन काही वेळेत येताना नजरेस पडले आण िपथक सावध झाले; मात्र खैराची वाहतूक करणार्या टेम्पोच्या चालकाने काही अंतरावरूनच वनखात्याची सरकारी गाडी ओळखून दुसर्या रस्त्याने वाहन धाडले. ही बाब लक्षात येताच भगळे यांनीही सरकारी वाहन त्यांच्यामागे भरधाव घेतले.टेम्पोचा वेग अधिक व दुर्गम भागातील एकेरी रस्ता यामुळे गस्ती पथकाचे वाहन ओव्हरटेक करण्यास अपयशी ठरत होते. ही बाब लक्षात येताच पथकाने कौशल्याचा वापर करत अन्य शॉर्टकट कच्च्या रस्त्याचा पयार्य स्वीकारला आण ितस्करांच्या वाहनाच्या अगोदर पोहचून मुख्य रस्त्यावर शेवगेपाडा येथे पुन्हा सापळा रचला. काही वेळेतच मुख्य रस्त्याने भरधाव टेम्पो पथकाच्या सरकारी वाहनाजवळ आला यावेळी टेम्पोचालकाने वाटेत उभ्या असलेल्या पथकाच्या वाहनाला ‘कट’ मारु न टेम्पो पुढे नेला; मात्र त्याच्या टेम्पोत तांत्रिक बिघाड झाल्याने टेम्पो अचानकपणे बंद पडला. पथक टेम्पोपर्यंत पोहचत नाही तोच टेम्पोचालक व त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत टेम्पो सोडून जंगलात फरार होण्यास यशस्वीझाले.टोळी जेरबंद करण्याचे आव्हानतस्करांनी खैराची वृक्ष काही दिवसांपुर्वीच कापून जंगलात लपवून ठेवली होती. तोडलेला खैर वाहून नेण्याची चोरटे संधी शोधत होते. हरसूल या वनपरिक्षेत्राला अद्याप वनक्षेत्रपालच मिळत नसल्याने येथील धाडसी वनरक्षक, वनपाल, वनमजूरांवरच वनसंपदेची दारोमदार आहे. चिंचआहोळ-शेवगापाडा रस्त्यावर मध्यरात्री अंधाराचे साम्राज्य असताना वनरक्षक, वनमजूरांनी केलेली खैर जप्तीची कारवाई त्याचे मुर्तीमंत उदाहरण आहे. गुजरात सीमेपलीकडून नाशिक पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील खैर, सागाच्या जंगलात सक्र ीय झालेली तस्करांची टोळी जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगलtheftचोरी