कंधाणे : बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले केळझर (गोपाळ सागर) व पठावा (लघूप्रकल्प) धरण गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या संततधार पावसाने पुर्ण क्षमतेने भरले असुन आरम व हत्ती नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सदर धरणाचे पुजन करण्यात आले.धणण भरल्याने हया भागातील नागरिकांचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. हयाबरोबरच सटाणा शहराचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. बऱ्याच दिवसापासून रूष्ट झालेला वरूण राजा गेल्या पंधरा दिवसापासून थोडया विश्रांती नंतर परत हया परिसरात हजेरी लावत आहे.दोन्ही धरण भरल्याने हया भागातील बळीराजा सुखावला आहे. निसर्ग मित्र राकेश घोडे व तेथील नागरिकांच्या हस्ते दोन्ही धरणाचे विधीवत जलपुजन करण्यात आले. बागलाणचा बहुतांशी भाग ओलिताखाली आणण्यात केळझर (गोपाळ सागर) व पठावा धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा मोठा फायदा आहे.हया धरणाच्या मुख्य जलवाहीनी आरम व हत्ती नदीवर हया भागातील सार्वजनिक पाणीपुरवठा व शेतीसिंचनाचे भवितव्य अवलंबून आहे. आरम नदीवर पश्चिम भागातील डांगसौदाणे, तताणी, साकोडे, बुंधाटे, करंजखेड, दिहंदुले, निकवेल, कंधाणे, चौंधाणे, मुंजवाड, आराई, मळगाव हया भागातील शेती सिंचन व सार्वजनिक पुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहे. तर हत्ती नदीवर जोरण, कपालेश्वर, वटार, औदाणे हया भागातील शेती सिंचन व सार्वजनिक पुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहे केळझर (गोपाळ सागर) धरणाच्या जलसाठ्यावर कंधाणे, चौंधाणे, मुंजवाड, आराई, सटाणा येथील हजारो एकर पाटस्थळ बागायत शेती क्षेत्र ओलिताखाली येते. हया धरणाच्या पाण्यावर हया शेतीक्षेत्राला रब्बी, खरीप हंगामाला चांगला फायदा होत असतो. वरूण राज्याने हया भागावर कृपादृष्टी केल्याने दोन्ही धरण भरल्याने हया भागातील बळीराजा सुखावला आहे. हया धरणाचे जलपुजन निसर्ग मित्र राकेश घोडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तिळवणचे विनमित्र दिलीप आहिरे, निकवेलचे शेतकरी संदीप सोनवणे, पंकज बिरारी आदी उपस्थित होते.
केळझर, पठावा धरणाचे जलपुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 19:32 IST
कंधाणे : बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले केळझर (गोपाळ सागर) व पठावा (लघूप्रकल्प) धरण गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या संततधार पावसाने पुर्ण क्षमतेने भरले असुन आरम व हत्ती नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सदर धरणाचे पुजन करण्यात आले.
केळझर, पठावा धरणाचे जलपुजन
ठळक मुद्देगेल्या पंधरा दिवसापासून थोडया विश्रांती नंतर परत हया परिसरात हजेरी लावत आहे.