शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कांदाफेको आंदोलन

By admin | Updated: August 24, 2016 22:12 IST

निफाड : शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध; तहसीलदारांना निवेदन

निफाड : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कांद्याला आजही योग्य हमीभाव मिळत नसल्याने निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कांदा उत्पादकांनी निफाड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कांदाफेको आंदोलन केले. निफाड उपबाजार येथून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याने भरलेले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. शासनाविरोधी घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र डोखळे, निफाड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सिद्धार्थ वनारसे, प्रांतिक सदस्य भाऊसाहेब भवर, तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलास मत्सागर, महिला अध्यक्ष अश्विनी मोगल, विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, तालुकाध्यक्ष रतीश टर्ले, अश्पाक शेख, सुरेश कमाणकर, निफाडचे नगरसेवक देवदत्त कापसे, विक्र म रंधवे, रावसाहेब गोळे, संपत व्यवहारे, आरिफ मणियार आदिंसह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.कांदाप्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे मत बनकर यांनी यावेळी व्यक्त केले. गोदावरीच्या पुरामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व घराचे व दुकानांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राजेंद्र डोखळे, अनिल कुंदे, जयदत्त होळकर, सुभाष कराड, भाऊसाहेब भवर, विक्र म रंधवे, सिद्धार्थ वनारसे, संपत व्यवहारे, अश्विनी मोगल आदिंची भाषणे झाली. यानंतर निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या पोलीस पथकाने बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)