कनाशीत जोगेश्वरी माता नवरात्रोत्सव

By Admin | Updated: September 30, 2014 21:53 IST2014-09-30T21:53:45+5:302014-09-30T21:53:57+5:30

कनाशीत जोगेश्वरी माता नवरात्रोत्सव

Kanashit Jogeshwari Mata Navaratri Festival | कनाशीत जोगेश्वरी माता नवरात्रोत्सव

कनाशीत जोगेश्वरी माता नवरात्रोत्सव

कनाशी : सप्तशृंगी निवासिनी देवीपासून १५ कि.मी. अंतरावरील गिरणा नदी काठावरील कनाशी गावाच्या पश्चिमेला जोगेश्वरी मातेचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवीची एक भगिनी असलेल्या जोगेश्वरी माता मंदिरात नवरात्र कालावधीत नऊ दिवस घटस्थापना होते. येथे महिला मोठ्या संख्येने घटी बसतात. गावात सुख, शांतता लाभावी या हेतूने वेशीजवळ रेघ मारण्याची प्रथा होती. कालांतराने ही प्रथा बंद झाली. ग्रामदेवतेचे हे मंदिर जीर्णोद्वाराच्या प्रतीक्षेत होते. एकता फ्रेंड सर्कलने मंदिराचे व्यवस्थापन हाती घेऊन सर्वप्रथम मंदिराचा जीर्णाेद्वार करण्यात आला. मंदिराचे आरसीसी बांधकाम करण्यात आले. शोभिवंत फुलांची झाडे लावण्यात आली. नित्यनेमाने दैनंदिन पूजा, सेवा व विविध धार्मिक कार्याक्रमांचे आयोजन ग्रामस्थ व एकता फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते करत असतात. मंडळातर्फे नवरात्रोत्सवात दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविले जातात. दांडिया, गरबा यांच्या आयोजनाबरोबरच रांगोळी स्पर्धा, युवक-युवतींचा सन्मान आदि उपक्रम राबविले जातात. नवरात्रोत्सव काळात भाविकांना फराळाचे वाटप केले जाते. (वार्ताहर)
दुचाकीला लावलेल्या पिशवीतून रक्कम लंपास
नाशिक : धान्य व्यापाऱ्याने पंक्चर काढण्यासाठी लावलेल्या दुचाकीच्या पिशवीतून एक लाख दहा हजारांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना वडाळा - पाथर्डी रस्त्यावर सोमवारी दुपारी घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात
चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Kanashit Jogeshwari Mata Navaratri Festival