शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कळवणकरांना मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: September 11, 2016 01:04 IST

सामाजिक बांधिलकी : अनावश्यक खर्चाला फाटा देत बसविले ‘एटीएम’

 कळवण : स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या आणि नंतरच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे एक व्यासपीठ. मनोरंजनाचे कार्यक्र मही दर्जेदार असत. आता मात्र गणेशोत्सव दिखाऊ झालेला असताना कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगारप्रणीत महाराज युवा फाउंडेशन सोशल गु्रपने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकीतून शुध्द पिण्याच्या पाण्याच्या एटीएमची सुविधा कळवणकरांना उपलब्ध करु न देत त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शुध्द पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. शहरात अजून दोन ठिकाणी एटीएम बसविण्याचा मानस यावेळी मंडळाने व्यक्त केला.झगमगाटी आणि डोळे दिपवणारी सजावट , २१ फुटी किंवा त्याहीपेक्षा उंच मूर्तीवर वारेमाप खर्च , गुलाल व ढोलताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक या सर्व गोष्टींना फाटा देऊन महाराज युवा फाऊंडेशन सोशल ग्रृपने स्थापनेच्या पिहल्याच वर्षी कळवणकरांसाठी पाच रुपयांत २० लीटर शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणारी एटीएम सुविधेचा शुभारंभ प पू श्री श्री १००८ महामंडलेश्वर राष्ट्रसंत इंद्रदेव महाराज यांच्या हस्ते करण्यात येऊन कळवणकरांसाठी लोकार्पण करण्यात आले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सुनीता पगार, गटनेते कौतिक पगार, जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र देवरे , जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, कांदा व्यापारी योगेश महाजन, नगरसेवक जयेश पगार, अतुल पगार, साहेबराव पगार, बाळासाहेब जाधव, सागर जगताप आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गणेशोत्सवाचा समाज प्रबोधनाचा मूळ उद्देश कुठे तरी हरवून चालला आहे. मोठ्या शहरांमधील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे वर्षभर काही ना काही सामाजिक कार्य करत असले तरी गणेशोत्सवातून जो सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोचायला हवा तो पोचत नाही हे लक्षात घेऊन महाराज युवा फाऊंडेशन सोशल ग्रुपने सामाजिक बांधिलकीतुन शुध्द पिण्याचे पाण्याची पुरवठा करणारी यंत्रणा उभी करु न अत्यंत अल्पदरात सुविधा उपलब्ध करु न दिल्याने याचा शहरातील सर्वसामान्य कुटुंबाना तसेच व्यापारी व व्यावसायिकांना उपयोग होणार आहे. शहरात अजून दोन ठिकाणी एटीएम बसविण्याचा मानस असल्याची माहिती यावेळी मंडळाचे मार्गदर्शक भूषण पगार यांनी दिली. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रोहीत पगार, अध्यक्ष पंकज पाचिपंड, उपाध्यक्ष राजेंद्र पगार, नंदू पगार, गणेश शिरोडे, हरिश जाधव, असलम शेख, सुधाकर खैरनार, राहुल पगार, सुनिल गांगुर्डे, बालु गांगुर्डे, धीरज निकम,नरेंद्र चव्हाण, प्रवीण वाघ किशोर चव्हाण विनोद मालपूरे पराग देशमुख भालचंद्र वाघ आबा पगार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)