शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जावडेकर यांचा दावा : स्वतंत्र विदर्भाबाबत योग्य वेळी घेणार निर्णय

By admin | Updated: September 30, 2014 22:54 IST

शिवसेनेशिवाय भाजपाला मिळणार बहुमत

नाशिक : १९७८ नंतर प्रथमच महाराष्ट्रात राजकीय इतिहास बदलत असून, आघाडीऐवजी प्रथमच एका पक्षाला बहुमत मिळून सत्ता येणार आहे, असा दावा भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. शिवसेना बरोबर नसतानाही भाजपाला यश मिळेल काय, या प्रश्नावर त्यांनी भाजपालाच सत्ता मिळेल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, स्वतंत्र विदर्भाबाबत भाजपा ठाम असून, त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असा दावा त्यांनी केला.विधानसभा प्रचारासाठी मुलुखमैदान या उपक्रमांतर्गत नाशिकला आलेल्या प्रकाश जावडेकर यांनी वसंतस्मृती येथे पत्रकारांशी बोलताना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली. दोन्ही पक्ष एकमेकांच्या पापात सहभागी होण्यास तयार नाहीत असे सांगत आहेत; परंतु पंधरा वर्षे त्यांनी संयुक्त पातक केले आहे. त्यामुळे त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल, असे सांगून त्यांनी या निवडणुकीत भाजपा महायुती निवडणूक लढवित आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाच्या यशाची प्रचिती आली आहे. राज्यात हीच परिस्थिती होणार असून, भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला. शिवसेनेशिवाय हे यश मिळेल, यालाही त्यांनी दुजोरा दिला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर कॉँग्रेस आणि आपला पक्ष एकत्र येऊ शकतात, असे म्हटले आहे. याबद्दल जावडेकर यांनी शरद पवार यांचे अभिनंदन करीत, त्यांनी हे अगोदरच कबूल केले हे बरे असल्याचे सांगितले. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला गरज भासल्यास शिवसेनेला बरोबर घेणार काय, या मुद्द्याला सोयीने बगल देत ते त्याच वेळी समजेल, असे सांगितले. भाजपाला स्वतंत्र विदर्भ हवा आहे, या मुद्द्यावरही त्यांनी बोलताना स्वतंत्र विदर्भ ही भाजपाची सैद्धांतिक भूमिका असून, त्यात स्थळ, काळ परत्वे योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)