शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात इन्व्हर्टर

By admin | Updated: July 17, 2017 00:39 IST

चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयात नवीन चार बॅटरी व इन्व्हर्टर बसविण्यात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठांनी तातडीने दखल घेत रूग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महेश गुजराथी । लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयात नवीन चार बॅटरी व इन्व्हर्टर बसविण्यात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठांनी तातडीने दखल घेत रूग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुंबई-आग्रारोेडवर नेहमीच अपघात होत असल्याने येथे शासनाने सुमारे ७० खाटांचे रुग्णालय दिले; मात्र येथे डॉक्टरांची संख्या अपुरी असून, राज्य शासनाने येथे ट्रामा केअर सेंटर सुरू केले आहे. परंतू येथे यंत्रसामग्री नसल्याने यांची असून अडचण नसून खोळंबा झाल्याचे चित्र दिसत आहे. समस्यांनी या चांदवड उपजिल्हा रुग्णालयाला ग्रासले असून, वरिष्ठ जिल्हा शल्यचिकित्सक, लोकप्रतिनिधींचे या रुग्णालयाकडे दुर्लक्ष असल्याने येथील रुग्णांना  सेवा मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.  गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मनमाड येथील डॉ. नरवणे यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक म्हणून चांदवड रुग्णालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे मनमाड येथील भार असल्याने ते चांदवड येथे आठवड्यातून एक दिवस येतात, त्यामुळे त्यांचे पाहिजे तेवढे लक्ष या उपजिल्हा रुग्णालयाकडे नाही. या रुग्णालयात सद्यस्थितीत मात्र हे डॉक्टर बालरोग तज्ज्ञ असल्याचे समजते. . त्यामुळे या चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयाकडे वरिष्ठांचेही पाहिजे तेवढे लक्ष पहिल्यापासून दिसत नाही. त्यामुळे हे चांदवडचे उपजिल्हा रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.येथील शवविच्छेदन गृहातील सर्वच दरवाजे व खिडक्या या तुटल्या असून, येथे शव ठेवल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. या रूग्णालयाचा नागरिकांना उपयोग होत नसल्याने वरिष्ठांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत असून, कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधीक्षक नेमावे अशी मागणी होत आहे.  आता बॅटरी इन्व्हर्टर मिळाले; मात्र अजूनही डॉक्टरांची संख्या वाढवून मिळावी, चांदवड येथील ट्रामा केअर सेंटरला सर्व यंत्रसामग्री देऊन ते त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.